नाशिक : 36 व्या नॅशनल गेम्स गुजरात, 2022 मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लखांब संघाने ( Maharashtra Mallakhamba Team Win Gold Medal ) मल्लखांबात सर्वोच्च पदक मिळवून महाराष्ट्राचे ( Winning Highest Medal in Mallakhamba ) नावलौकिक केले ( Won Gold Medal in Womens Team ) आहे. महाराष्ट्र संघाने आपली चमकदार कामगिरी दाखवून महिला संघाने सांघिक विजेतेपदामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ( यात रूपाली गंगावणे ( Rupali Gangawane Win Gold Medal ), जान्हवी जाधव, श्रुती उतेकर, नेहा क्षीरसागर, पलक चुरी, आकांक्षा बर्गे या खेळाडूंचा सहभाग होता ) तर पुरुष गटाने सांघिक विजेतेपदामध्ये रौप्यपदक पटकावले आहे. ( यात शुभंकर कवले, अक्षय तरळ, आदित्य पाटील, दीपक शिंदे, सागर राणे, कृष्णा आंबेकर यांचा सहभाग होता. )
हे आहेत सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी : महिलांमध्ये वैयक्तिक विजेतेपदासाठी रुपाली गंगावणे ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर जान्हवी जाधव हीने रौप्यपदक पटकावले. तसेच, पुरुषांमध्ये वैयक्तिक विजेतेपदासाठी अक्षय तरळ याने नेत्रदीपक कौशल्य सादर करीत तो सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर शुभंकर कवले याने रौप्यपदक पटकावले. साधन विजेतेपदात महिलांमध्ये पुरलेल्या मल्लखांबात जान्हवी जाधव हिने रौप्यपदक तर रुपाली गंगावणे हिने कांस्यपदक पटकावले.
सुवर्ण व रौप्य पदकाचे मानकरी : रोप मल्लखांबात रुपाली गंगावणे हिने सुवर्णपदक, तर नेहा क्षीरसागर हिने कांस्यपदक पटकावले. साधन विजेतेपदात पुरुषांमध्ये पुरलेल्या मल्लखांबात शुभंकर कवले याने सुवर्णपदक तर दीपक शिंदे याने रौप्यपदक पटकावले. रोप मल्लखांबात अक्षय तरळ हिने सुवर्णपदक पटकावले.
13 पदके पटकवली : महाराष्ट्र मल्लखांब संघाने एकूण 13 पदके पटकावली आहेत. त्यात एकूण 6 सुवर्णपदके, 5 रौप्यपदके व 2 कांस्यपदके आहेत. या यशामागे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक गणेश देवरुखकर व नंदिनी कोळसे तसेच व्यवस्थापक यशवंत जाधव यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
प्रथमच मल्लखांब खेळाचा सहभाग : 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमच मल्लखांब या खेळाचा समावेश झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र मल्लखांब संघाने ऐतिहासिक कामगिरी करीत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA), भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया (MFI), महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (MOA) व महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना (MAMA) यांच्या सहकाऱ्यांने सर्व खेळाडूंनी यश संपन्न केले.