ETV Bharat / city

Godavari River Cleanliness : पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोदावरीची दुर्दशा, प्रदूषित पाणी थेट नदीत

author img

By

Published : Feb 20, 2022, 10:55 AM IST

तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची जगभरात ओळख आहे. नाशिकच्या गोदावरीमध्ये अस्थी विसर्जनासाठी, तीर्थस्नानासाठी आणि तीर्थ पिण्यासाठी लाखो भाविक नाशिकला येत असतात. मात्र, गोदावरीच्या पाण्याची ( Godavari River Polluted ) पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्दशा झाली आहे.

गोदावरी
Godavari River

नाशिक - तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकच्या गोदावरीचे पावित्र्य राखण्यात अपयश आल्याने महापालिकेवर चहू दिशांनी टीका होत आहे. तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची जगभरात ओळख आहे. नाशिकच्या गोदावरीमध्ये अस्थी विसर्जनासाठी, तीर्थस्नानासाठी आणि तीर्थ पिण्यासाठी लाखो भाविक नाशिकला येत असतात. मात्र, गोदावरीच्या पाण्याची ( Godavari River Polluted ) पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्दशा झाली आहे.

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषित पाणी नदीत...

सोमेश्वर धबधबा परिसर प्रदूषणाच्या विळख्यात -

नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून अवघ्या दोनच वर्षांपुर्वी कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला गंगापुर गावातील मलनिस्सारण केंद्राकडे मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोदावरीची मोठी दुर्दशा झाली आहे.
नाशिकचा सोमेश्वर धबधबा परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. धबधबा आता फेसळला आहे. गोदावरी नदीचे पात्रही फेसाळलेल्या पाण्याने पांढरे झाले आहे. सोमेश्वर धबधबा परिसरातील गंगापूर गाव, आनंदवल्ली शिवारात दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रंचड दुर्गंधी देखील पसरल्याचं समोर आलं आहे. या सर्वासाठी कारणीभूत ठरत आहे, सोमेश्वर धबधबाच्या वरच्या बाजूस असणारा एसटीपी प्लँट, या मलनिस्सारण केंद्रातून गोदावरी नदीमध्ये कोणतीही प्रकिया करून पाणी सोडले जात नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप केला आहे.

दुर्गंधीयुक्त फेसाळ पाणी -

अवघ्या तीन दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता दीदींच्या अस्थींचे नाशिकच्या ज्या गोदावरीत विसर्जन झालं, त्या गोदावरीचा प्रवाह बघितल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ज्या गोदावरीचं पाणी भाविक तीर्थ म्हणून पितात, त्या गोदावरीत चक्क सांडपाणी आणि केमिकल युक्त पाणी मिसळले जात आहे. 35 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मल - जलशुद्धीकरण केंद्रात कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने हे दुर्गंधीयुक्त भेसळ पाणी लाखो नाशिककरांसोबतच देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी जीवघेणं ठरत आहे. पालिकेचा फिल्टरेशन प्लांट बंद असल्याने कोणतीही प्रक्रिया न करता हे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

येत्या आठ दिवसात सुधारणा झाली नाही, तर भव्य आंदोलन उभारण्यात येईल -

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत 35 कोटी रुपये खर्च करून राज्यातला सर्वात महागडा एसटीपी उभारण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोणतीही प्रक्रिया न होताच हे पाणी गोदावरीत मिसळत जात आहे. जलशुद्धीकरण चालू राहिल्यावरही मशीन बंद करून रात्रीच्या वेळी पाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक विलास शिंदे यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात सुधारणा झाली नाही. तर स्थानिक नागरिकाना बरोबर घेऊन भव्य आंदोलन उभारण्यात येईल. तर या ठीकाणच्या मशिनीरीचा आवाज म्हणजे मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं यावेळी परीसरातील महिलांनी सांगितले आहे.
यासदर्भात नेमकं प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष ..

कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी गोदावरीत सोडलं जात -

तब्बल 35 कोटी रुपये खर्च करून बांधलेल जलशुद्धीकरण केंद्र में.गोडवांन इंजीनियर्स लिमिटेड या कंपनीला पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. मात्र, या कंपनीकडून करारातील अटी आणि शर्तींना फाटा देत दूषित पाणीच नदीपात्रात सोडले आहे. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी पवित्र गोदावरीत सोडलं जात असल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून याला दुजोरा देत प्लांटमधील काही मशनरी नादुरुस्त झाल्यामुळे ते बंद असल्याचा सांगितलं. इतकंच नाही, तर नदीत सोडलेल पाणी कमी प्रमाणात दूषित असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. जगभरात नाशिकची ओळख गोदावरी मुळे आहे.अशुद्ध पाण्यामुळे गोदावरी प्रदूषित होऊन विद्रूप होऊ लागली आहे. त्यामुळे
प्रशासन यासदर्भात नेमकं काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा - FIR Against Sameer Wankhede : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.