ETV Bharat / city

नाशिकमधील उद्योगांना 20 टक्के तरी ऑक्सिजन द्या; उद्योग संघटनांची मागणी - oxygen to industries in Nashik

शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने जिल्हा प्रशासनाने उद्योगांसाठी होणारा 80 ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे थांबून तो आरोग्यासाठी वळवला आहे. त्यामुळे आता उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत नसल्याने नाशिकमधील उद्योग संकटात सापडले आहेत.

nashik oxygen news
नाशिक
author img

By

Published : Sep 22, 2020, 5:32 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, शहरात आरोग्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाने उद्योगांसाठी होणारा ऑक्सिजनचा संपूर्ण पुरवठा आरोग्यासाठी वळवला. मात्र, यामुळे अनेक उद्योग बंद पडले असून, शासनाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी उद्योग संघटनांनीं केली आहे.

नाशिकमधील उद्योगांना 20 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी

नाशिक जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, रोज 1500 ते 2 हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातचं शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने जिल्हा प्रशासनाने उद्योगांसाठी होणारा 80 ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे थांबून तो आरोग्यासाठी वळवला आहे. त्यामुळे आता उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत नसल्याने नाशिकमधील उद्योग संकटात सापडले आहेत.

हेही वाचा - मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक; विनापरवानगी केला होता रेल्वे प्रवास

यात मुख्यतः स्टील उद्योग आणि मेटल कटिंगसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो. मात्र, आता ऑक्सिजनच मिळत नसल्याने 3 हजार 500 उद्योग संकटात सापडले आहेत. त्यामुळे किमान 20 टक्के तरी ऑक्सिजन उद्योगांसाठी मिळावा, ही मागणी नाशिक उद्योजक संघटनेकडून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास उद्योग बंद पडतील, तसेच उद्योग बंद पडले तर हजारो कामगार बेरोजगार होतील, अशी भीती देखील उद्योजकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने यातून मार्ग काढला नाहीतर हा प्रश्न अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.