नाशिक: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चालत्या गाडीत एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका संशयितास Adgaon Police आडगाव पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार युवती मामाच्या गावाला जाण्यासाठी नांदूर नाका या भागात रस्त्यावर उभी होती. लिफ्ट घेण्यासाठी एका कारला तिने हात दिला. याप्रकरणी संशयिताने कार थांबून या युवतीला गाडीत बसवले. यानंतर काही किलोमीटर गाडी पुढे गेल्यानतर संशयिताने गाडी रस्त्यात थांबून युवती बरोबर अश्लील चाळे करून तिला बलात्कार करण्याची धमकी Threat of rape दिली.
या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली टोल नाक्यावर गाडी हळू झाल्यानंतर या युवतीने आरडाओरड करत मदतीची मागणी केली आणि गाडीखाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित आरोपी हा तिला गाडीत ओढत होता. ही बाब टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस देखील काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संशयिताने पोलिसांना देखील शिवीगाळ केली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित व्यक्तीविरोधात विनयभंग आणि पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. तसेच शहरात चेन स्नाचिंगच्या घटना वाढल्या असून रस्त्यावर देखील महिला सुरक्षित नाहीत. एकीकडे महिला सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना, दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये पोलिसांचा वचक राहिला नाही, असे चित्र दिसून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.