नाशिक इगतपुरी तालुक्यात राहणाऱ्या तुळसाबाई आगिवाले या महिलेने तीन वर्षपूर्वी अवघ्या तीन हजार रुपयांसाठी, आपली मुलगी गौरीला संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील विकास कुदनर यांच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी पाठवले होते. यानंतर संशयितांनी गौरीला चटके, गळफास देत बेदम मारहाण Girl died due to brutal beating of shepherds केली. आई तुळसाबाईच्या घरासमोर टाकून पलायन केलं होतं. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला. घोटी पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. Nashik crime
आठ दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळसाबाई सुरेश आगिवले यांनी, तीन वर्षांपूर्वी मुलगी गौरी हिला मेंढपाळ विकास सिताराम कुदनर ( राहणार संगमनेर ) यांच्याकडे तीन हजार रुपयात मेंढ्या चालण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर त्यांनी गौरीला प्रचंड मारहाण केली. 27 ऑगस्टला मध्यरात्री गौरीला इगतपुरी येथील तिच्या झोपडीजवळ गंभीर स्थितीत टाकून पलायन केलं brutal beating of shepherds होतं. यावेळी गौरीच्या गळ्याभोवती आवळलेल्या दोरीचे वळ, चटके दिल्याचं दिसून आलं.आठ दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यू Girl died in Nashik झालाय. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
30 मुलीची विक्री काही मेंढपाळ हे पैशाच्या आमिष दाखवून लहान मुलांना मेंढ्यासोबत घेऊन जातात. त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करतात. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रकरणानंतर श्रमजीवी संघटना आणि आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाड्या वस्त्यांवर केलेल्या पाहणी दरम्यान, अशा 30 मुलींची विक्री झाल्याचं उघडकीस आलं आहे. आतापर्यंत मेंढपाळांना विकलेल्या चार मुलांची सुटका आदिवासी संघटनेने केली आहे.
कठोर कारवाई करणार घडलेल्या प्रकार अत्यंत गंभीर असून माहिती समजतात घोटी पोलिसांना तपासाचे आदेश दिलेत. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं. girl killed by beating for sheep sale low price in Nashik