ETV Bharat / city

Fuel Rate Hike in Nashik : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ आता सीएनजीही महाग - Petrol

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा इंधन दरात वाढ ( Fuel Rate Hike in Nashik ) होण्यास सुरुवात झाली आहे. 22 मार्चपासून तब्बल 14 वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली. यापाठोपाठ सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ झाली असल्याने वाहनधारकांसह सामान्य नाागरिकही त्रस्त झाले आहेत.

CNG
CNG
author img

By

Published : Apr 14, 2022, 3:48 PM IST

नाशिक - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 22 मार्चपासून तब्बल 14 वेळा पेट्रोल व डिझेलच्या ( Diesel ) दरात वाढ झाली. यापाठोपाठ सीएनजीच्या ( CNG ) दरात चार रुपयांनी वाढ झाली असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे.

मागील महिनाभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचेही दर वाढले आहेत. यात पेट्रोल ( Petrol ) 10 रुपये 45 पैसे तर डिझेल 10 रुपये 35 रुपये प्रति लिटर महागले आहे. तसेच सीएनजीच्या दरात 4 रुपये 4 पैसे रुपयांनी वाढ झाली असून सीएनजी ( CNG ) 67.9 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढ ( Fuel Rate Hike in Nashik ) केली आहे.

रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागला - पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर वाढल्याने आता थेट परिणाम प्रवासी भाडेवाढीवर झाला आहे. वारंवार इंधन वाढ होत असल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अधिक भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याची झळ बसत आहे.

सरकारने भाव नियंत्रणात ठेवावे - दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत असल्याने आम्ही हैराण झालो आहोत. सुरुवातीला ऑफिसला जाताना आम्ही मित्र स्वतःचे वाहन वापरत होतो. मात्र, आता चार मित्र शेअरिंगमध्ये कारचा वापर करू लागलो आहोत. अशीच दरवाढ होत राहिली तर वाहने घरासमोर उभे राहतील. सरकारने इंधनदारवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

सीएनजीत 6.48 टक्के वाढ - मागील महिनाभरात सीएनजीच्या किंमतीमध्येही प्रति किलो 63 रुपये 5 पैसे वरून 67 रुपये 9 पैसेपर्यंत वाढ झाली आहे. ही दरवाढ ( Fuel Rate Hike in Nashik ) सुमारे 6.48 टक्के एवढी आहे. आज नाशिकमध्ये पेट्रोल 120.87 रुपये प्रतिलिटर, डिझेल 103.54 रुपये प्रतिलिटर, सीएनजी 67.09 रुपये प्रति किलो, असे दर आहेत.

हेही वाचा - Ambedkar Jayanti : तीन हजार पुस्तकांच्या सहायाने साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.