ETV Bharat / city

नाशिक महानगरपालिकेच्या बनावट वेबसाईटवरुन नागरिकाची फसवणूक

author img

By

Published : Jun 25, 2021, 10:56 PM IST

नाशिकच्या एका नागरिकाने ड्रेनेज चेंबर संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती. त्याने महापालिकेच्या वेबसाईट तक्रार केली होती. यामध्ये त्यांची 29 हजार 778 रुपयांची फसवणूक झाली.

नाशिक महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका

नाशिक - नाशिकच्या एका नागरिकाने ड्रेनेज चेंबर संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती. त्याने महापालिकेच्या वेबसाईट तक्रार केली होती. ही वेबसाईट बनावट असल्याचे समोर आले आहे. तक्रार करताना या नागरिकाकडून सुरुवातीला वीस रुपये तक्रार शुल्क घेण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून दोन टप्प्यांत 29 हजार 778 रुपये काढण्यात आले. याबाबत या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, महानगरपालिकेने ही वेबसाईट बनावट नसून, आपण चुकीच्या संकेतस्थळवर गेल्यामुळे ही फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

29 हजर 778 रुपये ऑनलाइन भरले

नशिक येथील दिंडोरी रोडवरील रहिवाशी योगेश पाटील यांनी (24 जून)रोजी ड्रेनेजच्या चेंबर संदर्भात https://www.complaintboard.in/complaintboard-reviews/nashik-nmc-l५६९९२४ .html) या वेबसाईटवर तक्रार दाखल केली होती. मात्र, ही वेबसाईट बनावट असल्याचे समोर आले आहे. वेबसाईटवर तक्रार केल्यानंतर पाटील यांना (९७०७७ ५७३५५)या मोबाईलवरुन कॉल आला. तसेच, पुढील ७२ तासांत तक्रार निवारण केले जाईल असेही सांगितले. दरम्यान, या तक्रारीसाठी नाममात्र शुल्क भरावे लागेल असे कळवले. त्यानंतर शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन लिंक दिली. यामध्ये दोन टप्यात 29 हजर 778 रुपये ऑनलाइन भरले. मात्र, इतर ठिकाणी चौकशी केली असता, पाटील यांच्या आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तत्काळ त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे.

नाशिक महानगरपालिकेकडून आवाहन

नाशिक महानगरपालिकेचे (www.nmc.gov.in) हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना मनपा कामकाजासंबंधित तक्रार दाखल करण्यासाठी (Grievance) ही लिंक देण्यात आली आहे. तसेच, नाशिक मनपाने नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी (Google Play Store मध्ये nmc e-connect) हे अधिकृत मोबाईल् ॲप्लिकेशनही उपलब्ध करुन दिलेले आहे. त्याद्वारे नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करता येतात. तरी, दोन्ही पर्याय मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महानगरपालिका पैशांची मागणी करत नाही

नाशिक महानगरपालिका ही नागरी सेवा पुरविणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पालिका विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना पुरविते. अशाप्रकारे तक्रार निवारण करण्यासाठी पालिकेकडून कोणतेही चार्जेस घेण्यात येत नाही. त्याचप्रमाणे पालिकेची (www.nmc.gov.in)ही अधिकृत वेबसाईट असून, ती पुर्णपणे सुरक्षित व पारदर्शक आहे. तरी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, मनपाच्या तक्रार निवारणासाठी अशाप्रकारे अनाधिकृत लिंकद्वारे कोणी पैशाची मागणी करीत असल्यास, जवळच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. अन्यथा, नाशिक सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.