नाशिक - नाशिकमध्ये एक बांधकाम व्यवसायिकाने ( Nashik Construction builder ) इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली 32 कुटुंबाची फसवणूक ( Fraud with 32 Families ) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिल्डरने चार वर्ष उलटूनदेखील इमारतीच्या जागेवर एका खड्या ( pit ) व्यतिरिक्त काहीच बांधकाम केले नसल्याने 32 कुटुंबांना अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. अशात अनेक कुटुंबाची आर्थिक ( Financial ), मानसिक परिस्थिती खराब ( bad mental condition ) झाल्याने त्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.
जमिनीचे भाव गगनाला भिडले - मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकच्या जमिनीचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. अशात काही गुन्हेगारी वृत्तीचे बांधकाम व्यवसायिक मोक्याच्या जमिनीवर डोळा ठेवत सर्वसामान्य नागरीकांची फसवणूक करत ( Fraud by builder ) जागा गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच एक प्रकार नाशिकचा उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड भागातील केतन सोसायटीतील नागरिकांसोबत घडला. चार वर्षापूर्वी डेव्हलपरने इमारती मधील 32 कुटुंबांना विश्वासात घेत शासकिय कुठलीही परवानगी न घेता. तसेच सदस्यना बँक गॅरंटी न देता,कुठलीही प्लॅन मंजूर न करता इमारत पडून टाकली. आज चार वर्षे उलटून सुद्धा इमारतीच्या ठिकाणी एक मोठ्या खड्या व्यतिरिक्त कुठलेच बांधकाम न केल्याने इमारतीमधील कुटुंबाना आपली फसवणूक झाल्याने आता त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत आम्ही सुयश डेव्हलपर्स यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
बिल्डरनकडून फसवणूक - बिल्डरने इमारत पुनर्बांधणीचा करारनामा करताना इमारतीमधील सदस्यांना विश्वासात घेतले नाही. इमारत पडताना त्यांना माहिती दिली नाही आणि वेळेवर बांधकाम पूर्ण न केल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याने या संदर्भात कोर्टात प्रकरण पाठवण्यात आलं आहे असं ऍडव्हकेट उमेश वालझाडे यांनी सांगितलं.
आता आम्ही आंदोलन करणार - चार वर्षांपूर्वी आमचे राहते घर बिल्डरने पडले. आता आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत. याचे भाडे देखील बिल्डर वेळेवर देत नाही. बिल्डर तीन वर्षांमध्ये नवीन इमारत बांधून देणार होता. आज चार वर्षे होत आले तरी त्यांने कामाला सुरुवात केली नाही. इमारत पडताना त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नाही. शासनाचे अनेक नियम धाब्यावर बसवले. आम्ही वारंवार याबाबत बिल्डरला फोन करतो. मात्र तो फोन उचलत नाही. याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात देखील गेलो. मात्र ही दिवाणी केस असल्याने त्यांनी आमची तक्रार घेतली नाही. आता आम्ही हातश झालो आहोत. या इमारतीमध्ये 70 टक्के नागरिक वयोवृद्ध आहेत. इमारतीच्या विचाराने दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना इमारतीच्या विचारामुळे आजार जडले आहे. आमची फसवणूक झाली आहे. पण आम्हला कोणी वाली नाही म्हणून आता आम्ही सगळे बिल्डर विरोधात उपोषणाला बसणार अस इमारतीच्या सदस्यांनी सांगितले.