नाशिक - एका भामट्याने महिंद्रा, बॉश, सिएटसह एकूण 10 नामांकित कंपनीचे कर्मचारी तसेच नोटप्रेस, एचएएल आणि इतर निमसरकारी विभागातील कर्मचारी अशा एकूण 1 हजार 888 कर्मचाऱ्यांचे बोगस विवरण पत्र तयार करत शासनाची तब्बल 16 कोटी 77 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.
हेही वाचा - युती होती, आहे आणि राहील; उद्धव ठाकरेंना विश्वास
नाशिकमधील प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार किशोर राजेंद्र पाटील नामक व्यक्तीवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्र, फौजदारीचा कट, विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास करण्यात येत असून प्राप्तिकर विभाग देखील या प्रकारामुळे चांगलाच कामाला लागला आहे. संबंधित आरोपी हा नक्की कोण आहे ? त्याची पार्शवभूमी काय ? याबाबत पोलिसांकडे अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नसून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा - कोल्हापूर-सांगली पूर प्रकरणी तत्काळ उपाययोजना कराव्यात - उच्च न्यायालयाचे आदेश