ETV Bharat / city

सुंदरनगर तोडफोड प्रकरण; निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पाच पोलिसांची तडकाफडकी बदली - नाशिक तोडफोड

सुंदरनगर भागात मागील भांडणाची कुरापत काढून काही समाजकंटकांनी कोयत्याने, लोखंडी रॉड आणि दांड्याने परिसरातील घरांच्या खिडक्याच्या काचा, दुचाकी, चारचाकी यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

nashik
निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पाच पोलिसांची तडकाफडकी बदली
author img

By

Published : Jun 16, 2020, 7:27 PM IST

नाशिक - देवळाली गावातील सुंदरनगरात झालेल्या वाहनांच्या तोडफोडप्रकरणी संशयितांना न्यायालयाने 17 जून पर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी शुक्रवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या सुंदर नगर पोलीस चौकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्यावर कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सुंदरनगर भागात मागील भांडणाची कुरापत काढून काही समाजकंटकांनी कोयत्याने, लोखंडी रॉड आणि दांड्याने परिसरातील घरांच्या खिडक्याच्या काचा, दुचाकी, चारचाकी यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी तत्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. उर्वरित संशयित फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री कर्तव्यावर असताना सुंदर नगर पोलीस चौकी जवळच हा प्रकार घडल्याने याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी पोलीस उप निरीक्षक गणपत जाधव, टिळेकर, मुंतोडे, प्रकाश चौधरी आणि नागलोथ यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.