ETV Bharat / city

नाशकात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई - Dushyant Bhamare on medicines bill

एफडीएच्या औषध निरीक्षकांनी जुने नाशिक भागात काही औषधी दुकांनाची तपासणी केली. यावेळी दुकानदार हे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्किप्शन व बिलाशिवाय औषध विक्री करत असल्याचे आढळून आले.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jun 22, 2020, 8:22 PM IST

नाशिक – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. विभागाच्या औषध निरीक्षकांनी शहरातील औषध विक्रेत्यांवर नोटीस बजावून औषध विक्री थांबविण्याची कारवाई केली.

एफडीएच्या औषध निरीक्षकांनी जुने नाशिक भागात काही औषधी दुकांनाची तपासणी केली. यावेळी दुकानदार हे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्किप्शन व बिलाशिवाय औषध विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यापैकी दोन औषध विक्रेत्यांना औषध विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर इतर तीन औषध विक्रेत्यांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिली आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठल्याही प्रकारच्या औषधांची व बिलाशिवाय औषध विक्री औषध विक्रेत्यांनी करू नये, अशा सूचना (एफडीए) सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिल्या आहेत. तसे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे भामरे यांनी सांगितले. नागरिकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिठ्ठीशिवाय उपचार घेवू नयेत, असे आवाहन सहआयुक्त भामरे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.