ETV Bharat / city

नाशिक: घरासमोर बसण्याच्या वादातून बाप - लेकाची हत्या - दोन गटात हाणामारी नाशिक

गणेश विसर्जनाच्या दिवशी घरासमोर बसण्याच्या वादतातून दोन गटात हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाचा आज उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बाप लेक
बाप लेक
author img

By

Published : Sep 3, 2020, 10:09 PM IST

नाशिक - पिंपळगाव शहरातील अंबिका नगर परिसरात घरासमोर बसण्यावरून दोन गटात वाद झाला. पुढे याच वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून प्रकरणी संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंबिकानगर परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी चारच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे आणि धाडीवाल या दोन गटात वाद झाला. त्यातील धाडीवाल गटाकडून शिंदे कुटुंबातील बाप-लेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात पुंडलिक गंगाराम शिंदे (६७) आणि माणिक पुंडलिक शिंदे (40) हे दोघे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी उपचारादरम्यान या बाप-लेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी विकी दत्तात्रय धाडीवाल (२७) आणि अजय प्रकाश धाडीवाल (१९), रा. अंबिकानगर, पिंपळगाव बसवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे करीत आहेत.

हेही वाचा - ठरलं..! राज्यात 'या' तारखेपासून एमएचटी-सीईटीची परीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.