नाशिक - जून महिना सापण्यावर आला असताना सुद्धा नाशिक जिल्ह्यात अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात करावी, असे जिल्हा कृषी विभागाने सांगितले आहे. तसचे, यावर्षी बियाणे, युरिया आणि खताचा तुटवडा भासणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आल्याचे देखील कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Schools Start : शाळा झाल्या सुरू, मुलांमध्ये उत्साह; विद्यार्थ्यांचे गुलाब, रांगोळ्या औक्षण करुन स्वागत
जिल्ह्यात अद्याप पाहिजे तशी पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे, येथील शेतकरी शेतात पिकांची पेरणी करण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, चांदवड, नांदगाव या भागांत काही प्रमाणत पाऊस झाला असून येथील काही शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात केली आहे. मात्र, पावसाच्या बाबतीत सर्वाधिक आघाडीवर असणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत केवळ 2.3 मिलिमीटर पावसची नोंद झाली आहे. या भागात ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी भातासाठी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाऊस समाधानकारक नसून पुढील आठ दिवसांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे, अस म्हटले जात आहे.
मुबलक खतांचा साठा - नाशिक जिल्ह्यात खतांचे नियोजन करण्यात आले आहे. आमच्या मागणीनुसार खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 1 लाख 18 हजार मेट्रिक टन खतांची मागणी असून 1 लाख 40 हजार एवढा खताचा पुरवठा झालेला आहे. सद्या खताची मागणी वाढली आहे. नाशिक हा कृषिमंत्री यांचा जिल्हा असल्याने इथे चोख नियोजन करण्यात आले आहे. 6 हजार मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक ठरवण्यात आला आहे. ज्या तालुक्यात खतांची टंचाई जाणवेल तिथे त्याचा वापर करण्यात येइल, असे कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी सांगितले.
पेरणी क्षेत्र - नाशिक जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 6.66 लक्ष हेक्टर आहे. सन 2021-22 मध्ये ऊस वगळता खरीप हंगामात 6.43 लक्ष हेक्टरवर 96 टक्के पेरणी झाली होती. 2022-23 साठी 6.46 लक्ष हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2022 - 23 मध्ये तृणधान्य पिकाचे 4.37 लक्ष हेक्टर क्षेत्र प्रस्थापित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मका व सोयाबीन पिकाची पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील 5 वर्षांत झालेला पाऊस -
2016 - 102.75 मि.मी
2017 - 127.05 मि.मी
2018 - 58.80 मि.मी
2019 - 108 मि.मी
2020 - 94.34 मि.मी
2021 - 96 मि.मी
हेही वाचा - Trainee nurse commits suicide : नाशिकात प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या