ETV Bharat / city

खोट्या आरोपांमुळे 50 वर्षांची तपस्या पूराच्या पाण्यासारखी वाहून चालली, कांदे प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया - chhota rajan

आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. मी कधी युनिर्व्हसिटीत गेलो नाही. जे गेले असतील त्यांची चर्चा होत असेल. उगाचच भुजबळांवर आरोप करून प्रसिध्दी मिळविण्याचा काहींचा प्रयत्न दिसून येत असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. तसेच, खोट्या आरोपांमुळे 50 वर्षांची तपस्या पूराच्या पाण्यासारखी वाहून चालली की काय अस वाटत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

खोट्या आरोपांमुळे 50 वर्षांची तपस्या पूराच्या पाण्यासारखी वाहून चालली, कांदे प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Sep 30, 2021, 7:18 AM IST

नाशिक - नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. मी कधी युनिर्व्हसिटीत गेलो नाही. जे गेले असतील त्यांची चर्चा होत असेल. उगाचच भुजबळांवर आरोप करून प्रसिध्दी मिळविण्याचा काहींचा प्रयत्न दिसून येत असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. तसेच, 50 वर्षाची तपस्या अशा खोट्या आरोपांमुळे पूराच्या पाण्यासारखी वाहून चालली की काय अस वाटायला लागलय, असही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.

पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ

छोटा राजनचा पुतण्या अभय निकाळजे याने फोनवरून धमकी दिल्याचा आरोप

जिल्हा नियोजन विकास समितीमधील विकासनिधी वाटपावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात झालेला वाद चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच पालकमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात आपण दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीने आपल्याला धमकी मिळाल्याची तक्रार कांदे यांनी नाशिक पोलिसांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. छोटा राजनचा पुतण्या अभय निकाळजे याने फोनवरून धमकी दिल्याचेही कांदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात गोदावरी नदी पुरपाहणी दरम्यान भुजबळ यांना विचारले असता त्यांनी कांदेंना आपल्या शैलीत उत्तर दिले.

मी कधी 'भाई' युनिर्व्हसिटीत गेलो नाही

भुजबळांचे नाव घेतले की, प्रसिध्दी मिळते यासाठी काही लोक असा उद्योग करत असावेत. आमदार कांदे यांनी जे आरोप माझ्यावर लावले आहेत त्याबाबत चौकशीची मागणी मी स्वतः केली आहे. उगाचच खोटे आरोप लावून भुजबळांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. ज्या धमकीबाबत कांदेंनी तक्रार केली आहे तो प्रकार घोटी टोलनाक्यावर कांदे समर्थकांनी एका दांम्प्त्याच्या मारहाण प्रकरणाशी संबधित आहे. याचा माझ्याशी कोणताही संबध नाही. मी कधी 'भाई' युनिर्व्हसिटीत गेलो नाही. उगाचच माझ्यावर आरोप केले जात आहे असही ते म्हणाले आहेत. याची चौकशी तर व्हावीच शिवाय खोटे आरोप करणार्‍यांबाबतही गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे भुजबळ म्हणाले.

काय आहे प्रकरण?

नांदगावमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर त्यासाठी अतिरीक्त निधी देण्याची मागणी आमदारांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे केली होती. यावेळी आयोजित बैठकीतच दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले. परंतु, त्यानंतर हे प्रकरण शांत झालेले असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन आमदार कांदेंनी थेट न्यायालयातच दावा दाखल केल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. पालकमंत्री भुजबळांनी 10 कोटी रुपयांच्या कामाचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदारांनी केला. त्याविरोधात न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घे नाही तर आमच्याशी गाठ आहे, असा फोन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने 9664666676 या क्रमांकावरुन केल्याचे आमदार सुहास कांदें यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - भुजबळांविरोधातील तक्रार मागे घे; आमदार सुहास कांदेंना छोटा राजन टोळीचा फोन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.