ETV Bharat / city

कृषी कायदे रद्द करण्याचा मोठेपणा मोदींनी दाखवला, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोल‍ा

भाजप आमदार प्रा.फरांदे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यासाठी फडणवीस नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृषी कायदे रद्द केल्यावरून विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींना दाखवलाय. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
author img

By

Published : Nov 20, 2021, 4:14 PM IST

Updated : Nov 20, 2021, 4:24 PM IST

नाशिक - राजकारणात टीका करणारे टीका करतात. काम करणारे काम करतात.पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींना दाखवलाय. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही, असा टोला भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

टीकाकारांची भूमिका दुटप्पी -

भाजप आमदार प्रा.फरांदे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यासाठी फडणवीस नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृषी कायदे रद्द केल्यावरून विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. टीकाकारांना जनताच उत्तर देईल. टीकाकरांची भूमिका दुटप्पी असल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले. एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय. निर्णय राज्यसरकारला घ्यायचाय, असे ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस
संजय राऊत अहंकारी -

आजच्या सामनातील लेखावरून त्यांचा अहंकार झळकतोय. लेख लिहणारेच अहंकारी आहेत, अशी टिका त्यांनी शिवसेना नेते खा.राऊत यांच्यावर केली.

स्वतःच्या सरकारमध्ये काय चाललंय ते आधी बघा -

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, अन्य पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले लग्‍न समारोह नंतर पत्रकारांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा केला होता, टीकाकारांना जनता उत्तर देणार हे निश्‍चित आहे. कारण त्यांनी या कायद्याला विरोध केला आणि त्यावरून टीका केली हे सर्वांना समजत आहे.

ज्यावेळी यूपीएचे सरकार होते त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी फक्त 35 हजार कोटी रुपयांचे बजेट होतं. परंतु आता मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी 135 कोटी रुपयांचे बजेट आहे. राज्यामध्ये केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेमुळे नऊ हजार शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असे सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस पुढे म्हणाले की राज्यात दुसऱ्यावर टीका केली जाते. परंतु स्वतःच्या सरकारमध्ये काय चाललं आहे हे बघण्याची ताकद त्यांच्यात नाही. राज्य परिवहन महामंडळाचा तो संप सुरू आहे, तो मागे घेण्याबाबत तोडगा काढण्याबाबत सरकार विचार करायला तयार नाही. मी सरकारबरोबर चर्चा केली त्यांना काही मार्ग सांगितले आहेत. त्याबाबत त्यांनी गांभीर्याने विचार केला तर या संपातून नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Nov 20, 2021, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.