नाशिक - दिल्लीतील एका भुमाफियाला नाशिकमध्ये अटक करण्यात आली ( Land Mafia Arrest In Nashik ) आहे. दिल्ली पोलिसांच्या एएसटीने ही कारवाई केली आहे. पीयूष तिवारी असे या भुमाफियाचे नाव आहे. त्याच्याविरोधात 30 पेक्षा अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
पीयूष तिवारी हा नाशिकमध्ये पुनीत भारद्वाज नावाने राहत होता. त्याच्यावर उत्तर प्रदेश, पंजाब आणि नोएडात 1000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पीयूष तिवारीला न्यायालयाने फरार घोषित करत त्याच्याविरोधात 50000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
एएटीसला मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष तिवारी हा नाशिकमध्ये कांद्याचा व्यवसाय करत होता. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवत एएटीसच्या पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीवेळी, तिवारीने सांगितले की, त्याने 2011 मध्ये बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली होती. जेव्हा त्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यावेळी अंदाजे 120 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर मार्केटमध्ये उभे राहण्यासाठी पीयूषने एकच फ्लॅट अनेक खरेरीदारांना विकत त्यांची फसवणूक केल्याचे पोलिसांना म्हटलं आहे.
हेही वाचा - Drug Peddler Arrested : दहिसर परिसरातून 27 किलो गांजा जप्त; 67 वर्षीय आरोपी अटकेत