ETV Bharat / city

'गुगल पे'चा एक सर्च शेतकऱ्याला पडला ९१ हजार रुपयाला! - Cyber crime

त्यांनी गुगल पेचा  ग्राहक क्रमांक ऑनलाईन शोधला.  त्यावर कॉल केला असता अज्ञात व्यक्तीने रिचार्ज करण्यासाठी एनडेस्क नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. येथेच त्यांची फसगत झाली.

फसवणूक झालेला शेतकरी
author img

By

Published : Apr 13, 2019, 7:27 AM IST

Updated : Apr 13, 2019, 9:12 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील सातपूर भागातील शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर रिचार्ज करायचा म्हणून 'गुगल पे'चा आधार घेतला. मात्र त्यावरून रिजार्ज झाला नसल्याने त्याने गुगलवर सर्च करून एका व्यक्तीच्या सांगण्यावरून अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. त्यावर माहिती भरताच बँकेतून ९१ हजार रुपये गायब झाले. रवी भुंदुरे असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रवी भुंदुरे यांचा गुगल पेवरून दोन वेळा रिचार्ज अयशस्वी झाला. त्यांनी गुगल पेचा ग्राहक क्रमांक ऑनलाईन शोधला. त्यावर कॉल केला असता अज्ञात व्यक्तीने रिचार्ज करण्यासाठी एनडेस्क नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. येथेच त्यांची फसगत झाली.

फसवणूक झालेली माहिती सांगताना शेतकरी

समोरच्या व्यक्तीने विचारलेली सर्व माहिती त्यांनी विश्वासाने ऑनलाईन भरली. त्यानंतर काही मिनिटातच बँक खात्यातील रक्कम हळूहळू कमी झाली. आपली फसवणूक होत तर नाही ना अशी शंका येताच त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. तरीही त्यांच्या खात्यातून तब्बल ९१ हजार रुपये गायब झाले. नुकताच द्राक्षे विकून त्यांच्या पदरी दीड लाख रुपये आले होते. मात्र तेही गेल्याने रवी भंदुरे यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यांनी खाते बंद करत पोलिसात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. गुगलवर चुकीची माहिती असल्याने भंदुरे यांना गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार घेताना खातरजमा करुनच माहिती देण्याचे आवाहन सायबर पोलीस अधिकारी दीपक देसले यांनी केले .

सायबर गुन्हे नियंत्रणात यावे यासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जाते. तरीही सायबर गुन्हेगार नव्या क्लृप्त्या करून नागरिकांची फसवणूक करतात. गुगलवरील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. हे माहिती असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये, यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या, असे सायबर अधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:नाशिक मधील रवी भंदुरे या शेतकऱ्याला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करणं महागात पडलं अवघ्या काही मिनिटात शेतकऱ्याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झाले

Body:नाशिक मधील रवी बंधू रे सातपूर भागातील शेतकरी असो ते आपल्या मोबाईलवर रिचार्ज करायचा म्हणून त्यांनी गुगल पे चा आधार घेतला त्यावरून दोन वेळा रिचार्ज केला मात्र दोन्ही वेळेस केलेला रिचार्ज यशस्वी झाला नाही म्हणून गुगल पे वर जात गुगल पे चा नंबर शोधला आणि त्यावर कॉल केला त्या समोरील व्यक्तीने आपला रिचार्ज पूर्ण करण्यासाठी एनडेस्क नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करतात समोरच्या व्यक्तीने सांगितलेले सर्व माहिती भरली आणि काही मिनिटांच्या अंतरावर बँक खात्यातील रक्कम हळूहळू कमी होऊ लागले आणि आपली फसवणूक होत तर नाही ना अशी शंका येताच मोबाईल स्विच ऑफ केला आणि झाले तेच रवी भंदुरे यांच्या खात्यातून तब्बल 91 हजार रुपये गायब झाले नुकताच आपल्या द्राक्षबाग विकून त्याच्या पदरी दीड लाख रुपये आले होते आणि त्यातील 91 हजार रुपये गेल्याने रवी भंदुरे यांना मोठा मनस्ताप झाला आहे

Conclusion:यानंतर लागलीच रवी भुंदुरे यांनी खाते बंद करत पोलिसात धाव घेतली आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली गूगलवर चुकीची माहिती असल्याने भंदुरे यांना गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलंय त्यामुळे सायबर पोलिसांनी ऑनलाईन व्यवहार घेताना खातरजमा करूनच माहिती द्या अथवा व्यवहार करण्याचे आव्हान दीपक देसले सायबर पोलीस अधिकारी नाशिक यांनी केले नागरिकांना वेळोवेळी सायबर गुन्हे नियंत्रणात यावे यासाठी पोलिसांकडून आव्हान केले जाते गुगल वरील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही हे माहिती असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या
Last Updated : Apr 13, 2019, 9:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.