ETV Bharat / city

महापालिकेत कोरोनाचा शिरकाव; आयुक्तांच्या स्वीय सहाय्यक बाधित झाल्याने खळबळ

author img

By

Published : Jun 24, 2020, 5:38 PM IST

Updated : Jun 24, 2020, 6:31 PM IST

आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. प्रथमदर्शनी या कोरोनाबाधित स्वीय सहाय्यकाला कोणतेही लक्षण आढळून आले नसले, तरी त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

nashik
नाशिक महापालिका

नाशिक - महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा स्वीय सहाय्यक कोरोनाबाधित आढळून आल्याने नाशिक महापालिका क्षेत्रातील अनेक अधिकारी, कर्मचारी हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये येण्याची शक्यता असल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेत कोरोनाचा शिरकाव; आयुक्तांच्या स्वीय सहाय्यक बाधित झाल्याने उडाली खळबळ

मनपाच्या राजीव गांधी भवनमध्ये आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. प्रथमदर्शनी या कोरोनाबाधित स्वीय सहाय्यकाला कोणतेही लक्षण आढळून आले नसले, तरी त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वीय सहाय्यक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या नातेवाइकांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे स्वीय सहाय्यकाला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वीय सहायकाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपा आयुक्त गमे हे देखील हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आले असून ते देखील क्वारंटाइन होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागात एका शिपायासह महापालिकेच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर आता महापालिकेचे प्रशासन अधिकारी असलेल्या आयुक्तांच्या दालनातच कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात स्वीय सहाय्यकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाठोपाठच आलेल्या अहवालात महापालिकेच्या विद्युत विभागातील एका कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मनपा वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे या दोन्ही बाधितांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेऊन त्यांना विलीगीकरण करण्यात आले. कोरोना योद्धे अशी ओळख असलेले महापालिकेचे अनेक कर्मचारी, अधिकारीच आता हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये येत असल्याने सर्वांनाच अधिक सतर्क रहावे लागणार आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.