नाशिक - राज्यातील इतर जिल्ह्यांपाठोपाठ नाशिक जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागलाय, त्यामुळे सर्वच नागरिक सद्या चिंतेत आहेत. मात्र, या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतोय तो अंध व्यक्तींना.
अरुण भारस्कर - दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया संस्था अध्यक्ष
दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया संस्थेने तयार केलेल्या कोरोना माहिती पुस्तिकेमुळे अंध व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. त्यांना ही माहिती पुस्तिका वाचून कोरोना संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे हे समजणार आहे. सुरवातीला या संस्थेने १५०० पुस्तिका छापल्या असून याचे अंध विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.