ETV Bharat / city

शेतीमालाला पावसाचा फटका, नाशिकमध्ये कोथिंबीर २०० रुपये जुडी - पाऊस

नाशिकमध्ये कोथिंबीरीची जुडी २०० रुपये तर मेथीची प्रतिजुडी ६० रुपये दराने विक्री केली जात आहे.

कोथिंबीरची विक्री करताना विक्रेता
author img

By

Published : Jul 9, 2019, 9:42 PM IST

नाशिक - सततच्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, पालक आणि कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. जिल्ह्यासह शहर परिसरात कोथिंबीरीची जुडी २०० रुपये तर मेथीची ६० रुपये प्रतिजुडी दराने विक्री केली जात आहे. याशिवाय मुंबईत पालेभाज्यांना मागणी वाढल्याने बाजारभाव टिकून आहेत, असे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

कोथिंबीरची विक्री करताना विक्रेता

मागील आठवड्यापासून २०० रुपये प्रति जुडी म्हणजे २० हजार रुपये शेकडा दराने कोथिंबीरची विक्री होत आहे. नाशिक बाजार समितीतून मुंबईसह गुजरात राज्यात शेतमालाची निर्यात केली जाते. मुंबईला सध्या लातूर जिल्ह्यातील कोथिंबीर मालाची निर्यात काही प्रमाणात वाढली आहे. कोथिंबीरीला दरही चांगले मिळत असल्याने पालेभाज्या उत्पादकांच्या हाती चांगला पैसा पडू लागला आहे. पालेभाज्यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांचे हाल होताना दिसत आहे.

पालेभाज्याचे दर
कोथिंबीर - २०० रु जुडी
पालक - ४० रु जुडी
मेथी - ६० रु जुडी
शेपू - ३५ रु जुडी
कांदा पात - २१ रु जुडी
मुळा - २५ रु जुडी

Intro:जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, पालक,कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्यानं बाजारभाव तेजीत आहेत..Body:कोथिंबीर 200 रुपये तर मेथी 60 रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली.याशिवाय मुंबईत पालेभाज्यांना मागणी वाढल्यानं बाजारभाव टिकून आहेत, असं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितलं.गेल्या आठवड्यात पासुन 200 रुपये प्रति जुडी म्हणजे 20 हजार रुपये शेकडा दराने कोथिंबीरची विक्री झाली आहे. नाशिक बाजार समितीतून मुंबईसह गुजरात राज्यात शेतमालाची निर्यात केली जाते. मुंबईला सध्या लातूर जिल्ह्यातील कोथिंबीर मालाची निर्यातही काही प्रमाणात वाढली आहे.
Conclusion:सध्या जिल्हाभरात पाऊस लांबल्याने गाळपेऱ्यातील कोथिंबीरीच नाशिक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. कोथिंबीरीला दरही चांगले मिळत असल्याने पालेभाज्या उत्पादकांच्या हाती चांगला पैसा पडू लागला आहे पालेभाज्यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे

पालेभाज्याचें दर सद्या कसे आहेत बघुयात.....

कोथंबीर - 200 रु जुडी
पालक - 40 रु जुडी
मेथी - 60 रु जुडी
शेपू - 35 रु जुडी
कांदा पात - 21 रु जुडी
मुळा - 25 रु जुडी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.