नाशिक - गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएअशन ट्रेनिंग स्कूलमध्ये 34 व्या एव्हीएटर्स कोर्सचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. या वेळी कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 33 अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, यंदा पहिल्यांदा कोरोनामुळे हेलिकॉप्टरची हवाई प्रात्यक्षिके रद्द करण्यात आली होती.
हेही वाचा - 'सिरम'ने विकसित केली देशातील पहिली न्यूमोनिया लस
नाशिकच्या गांधीनगर येथे भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्था आहे. या कॉम्बॅट आर्मी एव्हीएअशन ट्रेनिंग स्कूलमध्ये 34 व्या एव्हीएटर्स कोर्सचा दीक्षांत सोहळा यंदा साध्या पद्धतीने संपन्न झाला. या वेळी कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 33 अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, दरवर्षी दिमाखात होणारा हेलिकॉप्टरच्या हवाई प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसेच, अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनादेखील आमंत्रित करण्यात आले नव्हते.
ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल आर्मी एव्हीएअशनचे मेजर जनरल ए. के. सूरी हे होते. त्यांच्या हस्ते कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 33 अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, वेगवेगळ्या विषयांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी, कॅप्टन संतोष कुमार सौरपल्ली यांना सिल्व्हर चित्ता ट्रॉफी, कॅप्टन तरीफ सिंग आणि कॅप्टन एस. के. शर्मा यांना बेस्ट फ्लाईंग ट्रॉफी, कॅप्टन बी. प्रभुदेवन यांना एयर ऑब्झर्व्हर पोस्ट 35 ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा - अंबाबाईच्या दर्शनाची वेळ पुन्हा वाढवली; सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत दर्शन