नाशिक - मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास सरकारने परवानगी दिली असून त्यामुळे दिवाळीत पहाट पाडवा, सांज पाडवा यांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व कलाकारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पाडवा पहाट व इतर मैफलींचे आयोजनाची शक्यता आहे.
राज्यशासनाने चित्रपट गृह व नाट्यमंदिरे खुली केली. मात्र, मोकळ्या मैदानावरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाबाबत संभ्रमवस्था होती. त्यातही दिवाळीत पाडवा व भाऊबीजेला अनेक सांस्कृतिक मंडळांकडून भरगच्च कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. मात्र, मोकळ्या जागेत परवानगी नसल्याने यंदा दिवाळीत श्रोत्यांना पाडवा पहाटची सुमधुर मैफली मेजवानी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मोकळ्या जागेवर कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी ही मागणी जोर धरत होती. अखेर शासनाने त्यास परवानगी दिल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकिय पक्ष व नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात पाडवा पहाट व इतर मैफलींचे आयोजनाची शक्यता आहे.
शासनाने निर्बंध शिथील करत मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र दिलेल्या अटिशर्ती व कोव्हिड नियमांचे पालन बंधनकारक असनार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून पहिली अटक.. आता नवीन खुलासे होण्याची शक्यता