ETV Bharat / city

#FASTAG : फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

author img

By

Published : Dec 21, 2019, 10:58 AM IST

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर वाहनधारकांसाठी फास्टॅगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. ईटीव्ही भारतने नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर घेतलेला ग्राउंड रिपोर्ट घेतला..

Composite reactions among vehicle holders regarding the use of Fastag
फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

नाशिक - फास्टॅगबाबत पाहिजे तशी जनजागृती न झाल्याने आणि फास्टॅगची कमतरता, यामुळे 15 डिसेंबरला करण्यात आलेली फास्टॅगची सक्ती महिनाभरासाठी शिथिल करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना आता पैसे देऊन टोलनाका ओलांडता येणार आहे. टोलनाक्यावर होणारी गर्दी, वायू प्रदूषण आणि वाहनधारकांना टोल नाका क्रॉस करण्यासाठी लागणार वेळ पाहता, केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडण्यासाठी वाहनावर फास्टॅग असणे सक्तीचे केले होते.

फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

हेही वाचा... आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!

वाहनावर लावण्यात आलेला फास्टॅग स्क‌ॅन झाल्यावर वाहनधारकांना काही वेळातच टोल क्रॉस करता येणार आहे. त्यांची टोलची रक्कम ही त्यांच्या फास्टॅग अकाउंटमधून जाणार असल्याने वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर फास्टॅगमुळे ऑनलाईन व्यवहार होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे अनेक वाहनधारकांनी म्हटले आहे.

हेही वाचा... ठाणे : कल्याणातील वीटभट्टीवरून 'श्रमजीवी'ने केली मजुरांची मुक्तता

नाशिक- मुंबई महामार्गावरील घोटी येथील टोलनाक्यावर 10 मार्गिका असून त्यापैकी 4 मार्गिका फास्टॅगसाठी आहेत. इतर 6 मार्गिका रोख व्यवहारासाठी ठेवण्यात आल्या आहेत. फास्टॅग मिळण्यासाठी काही बँकांनी टोलनाक्यावर देखील काउंटर उघडले आहे.

हेही वाचा... 'या' चार देशांच्या नागरिकांना भारतातील पर्वतशिखरांवर गिर्यारोहणासाठी परवानगी आवश्यक

#फास्टॅगसाठी कोणती कागदपत्रे लागतात

वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकाचा पासपोर्ट फोटो, वाहन मालकाची केवायसी कागदपत्रे.

#फास्टॅगचे फायदे

प्रवास करता वेळी रोख रक्कम लागणार नाही. वेळ वाचणार, टोल नाक्यावर न थांबता वाहन पुढे जाऊ शकेल त्यामुळे इंधन बचत होऊ शकते, फास्टॅगचे व्यवहार ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने करता येते, व्यवहार पूर्ण झाल्यावर संदेश येतो, तसेच रक्कम कमी झाल्यावर देखील संदेश येतो. कागदचा खर्च वाचतो, एखादे वाहन गुन्ह्यात वापरले गेले असेल आणि ते टोलनाक्यावरून गेल्यास वाहन मालकापर्यंत लवकर पोहोचणे शक्य होते. तसेच टोलनाक्यावरून जाणाऱ्या रोजच्या वाहनांची माहिती मिळाल्यामुळे त्याचे विश्लेषण करून वाहतूक सुधारण्यासाठी योजना तयार करता येऊ शकते.

हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचरा द्या आणि पोटभर जेवण करा

Intro:फास्टॅग बाबत वाहनधारकांच्या समिश्र प्रतिक्रिया..नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल येथील ग्राउंड रिपोर्ट...

Body:राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर वाहनधारकांसाठी फास्टॅगच्या सुविधा सुरू करण्यात आली आहे..मात्र ह्या शासन निर्णया बाबत वाहनधारकांनी समिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत...ई टीव्ही भारत ने नाशिक- मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावरील ग्राउंड रिपोर्ट घेतला..

फास्टॅग बाबत पाहिजे तशी जनजागृतीनं झाल्याने आणि फास्टॅगची कमतरता यामुळे 15 डिसेंबर रोजी करण्यात आलेली फास्टॅग सक्ती महिनाभरा साठी शिथिल करण्यात आली आहे,त्यामुळे आता वाहनधारकांना पैसे देऊन सुद्धा टोल नाका ओलांडता येणार आहे,टोल नाक्यावर होणारी गर्दी,वायू प्रदूषण आणि वाहनधारकांना टोल नाका क्रॉस करण्यासाठी लागणार वेळ,

बघता केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका क्रॉस करण्यासाठी वाहनावर फास्टॅग असणं सक्तीचे केलं आहे..वाहनावर लावण्यात आलेला फास्टॅग स्कँन झाल्यावर वाहनधारकांना काही वेळातच टोल क्रॉस करता येणार आहे,आणि त्याची टोलची रक्कम ही त्यांच्या फास्टॅग अकाउंट मधून जाणार असल्याने वाहनधारकांनी ह्या निर्णयाचे स्वागत केलं आहे..तर फास्टॅग मुळे ऑनलाईन ट्रँजंक्शन होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे म्हटलं आहे...

नाशिक- मुंबई महामार्गवरील घोटी टोल नाक्यावर 10 लेन असून त्यापैकी 4 लेन फास्टॅग साठी ठेवण्यात आल्या असून इतर 6 लेन कॅश ट्रँजंक्शन साठी ठेवण्यात आल्या आहेत..फास्टॅग मिळण्यासाठी काही नॅशनल बँकांन सोबत टोल नाक्यावर देखील बँकेने काउंटर उघडले आहे..

# फास्टॅग साठी कुठली कागदपत्रे लागतात
खरेदीसाठी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र वाहन मालकाचा पासपोर्ट फोटो वाहन मालकाची केवायसी कागदपत्रे लागतात

फास्टॅगची फायदे...
प्रवास करता वेळी रोख रक्कम लागणार नाही,वेळ वाचेल,टोल नाक्यावर न थांबता वाहन पुढे जाऊ शकेल त्यामुळे इंधनही वाचू शकते,फास्टॅगचे चार्जिंग ऑनलाइन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने करता येते,व्यवहार पूर्ण झाल्यावर एसएमएस येतो,तसेच बॅलन्स कमी झाल्यावर देखील एसएमएस येतो..कागदचा खर्च वाचतो,एखाद्या गुन्ह्यात वाहन वापरले गेले आणि ते टोल वरून पास झाल्यास वाहन मालका पर्यंत लवकर पोहचणे शक्य होते..टोल वरून जाणाऱ्या रोजच्या वाहनांची माहिती मिळाल्यामुळे त्याचे विश्लेषण करून वाहतूक सुधारण्यासाठी योजना तयार केली जाऊ शकते...

वन टू वन
प्रथमेश पुरोहित -टोल नाका अधिकारी
वाहनधारक बाईट...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.