ETV Bharat / city

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना कोरोनाची लागण

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांच्या दौऱ्यात उपस्थिती लावली होती.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे
जिल्हाधिकारी सुरज मांढरे
author img

By

Published : Jul 3, 2021, 3:09 PM IST

नाशिक - जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मांढरे यांनी मागील काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत दौरा केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले सुरज मांढरे हे दर आठवड्याला कोरोना चाचणी करत असतात. या आठवड्याची चाचणी केल्यानंतर शनिवारी (दि. 3 जुलै) त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने कहर केला असताना नाशिक जिल्ह्यात कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर सोपविण्यात आली. नाशिक जिल्ह्यात कोरोनाने तर कहरच केला. पहिल्या टप्यात मालेगावमध्ये कोरोना व्यवस्थापन करताना प्रशासनाचा कस लागला. तर दुसर्‍या लाटेत नाशिक शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. या काळात औषध पुरवठा, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयातील बेडची व्यवस्था करताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांवर जबाबदारी टाकण्यात आली. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पेलली. या काळातही प्रशासनातील अनेक अधिकारी कोरोना बाधित झाले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती निगेटिव्ह आली होती. पण, दुसरी लाट ओसरत असताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी मागील तीन दिवस पुणे येथे गेले होते. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी हे पुणे येथून परतले होते.

अनेक बडे नेत्यांच्या दौऱ्यात उपस्थिती

या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांनी नाशिकला दौरे केले. त्यांच्यासोबत मांढरे उपस्थित होते. तसेच शुक्रवारी (दि. 2 जुलै) स्मार्ट सिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नाशिकला स्मार्ट सिटीची महत्वाची बैठक घेतली. त्यातही ते उपस्थित होते. त्यामुळे मांढरे यांचा कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

हेही वाचा - केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर होणार नाही - अजित पवार

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.