ETV Bharat / city

Nashik Accident : एकाच दिवसात नाशकात दोन बस, दोन ट्रक जळून खाक; 12 जणांचा मृत्यू - passenger burnt to death

नाशकात पहाटे एक खाजगी बस अपघाता नंतर जळुन खाक झाली (private passenger bus caught fire) यात 12 प्रवाशांचा जागीच कोळसा झाला. तर दुसऱ्या अपघातात रस्त्यावर धावत असलेल्या एका बसला आग लागली यातील प्रवाशांना वाचवण्यात यश आले. तर तीसऱ्या अपघातात ऑक्सिजन सिलिंडरच्या गाडीला आग लागली यात सिलिंडरचा स्फोट होऊन हवेत उडाले (coal of Two buses and a cylinder truck due to a fire). या तीन अपघातांमुळे नाशिक हादरले ( Nashik shook) आहे.

Nashik Accident
नाशिक अपघात
author img

By

Published : Oct 8, 2022, 7:49 PM IST

Updated : Oct 8, 2022, 8:50 PM IST

नाशिक: एकाच दिवशी घडलेल्या चार वाहनांच्या आगीच्या वेगवेगळ्या घटनांनी नाशिक जिल्हा हादरला आहे, घडलेल्या या घटनेमुळे वाहन सुरक्षितते बाबत सर्वसामान्य नागरिकांन मधून चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या इतिहासात आजचा दिवस अग्नी तांडव दिवस म्हणून ओळखला जाईल,आज नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या वाहन आगीच्या घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आहे. एकाच दिवशी दोन प्रवाशी बस आणि एका ट्रकला लागलेल्या भीषण आगी मुळे सार्वजनिक वाहन व्यवस्थेबाबत चिंता ( Nashik shook) व्यक्त केली जात आहे.

पहिली घटना : यवतमाळ येथुन मुंबईच्या दिशेने निघालेली चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस पहाटे 5 च्या सुमारास नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर आली त्यावेळी
सर्व्हिस रोड वरून गुजरात दिशेने सिन्नर कडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली, बसची धडक ट्रकच्या डिझेल टाकीला लागल्याने काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली (private passenger bus caught fire) यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला, तर 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत जिल्हा शासकीय रुग्णालयातउपचारासाठी दाखल केले.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत: दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे Guardian Minister Dada Bhuse यांनी मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा शासनाने केली असल्याचे सांगितलं. तसेच ते शासकीय आयोजित दौरा चंदिगढ येथे असताना पालकमंत्री भुसे तेथून माघारी फिरले. त्यांनी घटना स्थळी तसेच रुग्णालयातील जखमींची चौकशी केली.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश: नाशिक बस दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुर्घटनेसाठी कोणी जबाबदार असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा तसेच विविध नेते पदाधिकारी राजकीय नेत्यांनी घटने बद्दल दुख: व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त केली तसेच जखमी आणि मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर असून केली. पंतप्रधानांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दुसरी घटना : आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंग गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशर द्वारे तातडीने आग विझविली.

तिसरी घटना: मनमाड-मालेगाव महामार्गावर कानडगाव शिवारात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात होऊन सिलिंडर गाडीने अचानक पेट घेतला. यत ऑक्सिजन सिलिंडर असल्याने स्फोट झाला.मनमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेलली. पोलिसांनी रस्ता ब्लॉक करून अग्निशमन दलाला पाचारण केले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. गाडीला आग लागल्या नंतर सिलिंडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाल्याचे पहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

चौथी घटना - मुंबई- आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथे चालत्या ट्रकने पेट घेतल्याची चौथी घटना घडली, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली..

Last Updated : Oct 8, 2022, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.