ETV Bharat / city

कोरोनाशी लढा; मुख्यमंत्र्यांकडून विश्वास नांगरे पाटलांच्या 'एसीपी' संकल्पनेचे कौतुक

जनजागृती करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी मुलांबरोबरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देखील पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या या व्हिडिओचे कौतुक केले आहे.

Police Commissioner
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
author img

By

Published : Apr 19, 2020, 3:26 PM IST

नाशिक - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोनाबाबत नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, या बाबत जनजागृती पर एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओच्या एसीपी संकल्पनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

कोरोनाशी लढा; मुख्यमंत्र्यांकडून विश्वास नांगरे पाटलांच्या 'एसीपी' संकल्पनेचे कौतुक

या व्हिडिओत विश्वास नांगरे पाटील हे कर्तव्यावरुन आपल्या घरी येतात, तेव्हा घराच्या दारात त्यांची गाठ घरातील एसीपी म्हणजेच त्यांच्या मुलांशी पडते. विश्वास नांगरे पाटील यांची दोन्ही मुले जान्हवी आणि रणवीर हे आपल्या वडिलांना डॅडी तुम्ही बाहेर सीपी असाल, तर आम्ही या घरातले अँटी कोरोना पोलीस आहोत. तुम्ही आधी फोन सॅनिटाईझ करुन घ्या, घरात येण्याअगोदर हात धुऊन घ्या, आणि घरात आल्यावर थेट बाथरुममध्ये जा, असा सूचना वजा आदेश हे दोन्हीही मुले आपल्या वडिलांना देताना दिसत आहेत. याचे सर्वांनी अनुकरण करावे, म्हणून जनजागृती करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी मुलांबरोबरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला नागरिकांनी पसंती देत हजारो लाईक मिळाल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देखील पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरू केलेल्या एसीपी मोहिमेचे कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.