ETV Bharat / city

'....म्हणून आपण एकाच बॅचचे' - police academy news

तुम्ही आज शपथ घेतली, मी पण एक महिन्यापूर्वी शपथ घेतली म्हणून आपण एकाच बॅचचे आहोत, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशकातील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यात केले.

nashik police academy
नाशकातील पोलीस अकादमीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:41 AM IST

नाशिक - तुम्ही आज शपथ घेतली, मी पण एक महिन्यापूर्वी शपथ घेतली म्हणून आपण एकाच बॅचचे आहोत, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशकातील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यात केले. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. 117 व्या तुकडीचे 689 पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल झाले आहेत.

नाशकातील पोलीस अकादमीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा - LIVE : अजित पवार होणार उपमुख्यमंत्री? प्रणिती शिंदेंचा पत्ता कट

दरम्यान, नाशिक येथील पोलीस अकादमीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच हजेरी लावली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही आज शपथ घेतली, मी पण एक महिन्यापूर्वी शपथ घेतली म्हणून आपण एकाच बॅचचे असल्याचा आनंद आहे. बदलत्या काळाप्रमाणे तलवारीची जागा रिव्हॉल्व्हरने घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कुठलीही कमतरता भासू देणार नाही. पोलिसांसाठी चांगले काम करू व तुमच्या आरोग्यासाठीही मी प्रयत्नशील आहे.

जी वर्दी कमवली आहे, त्याला कुठलाही कलंक लावू देऊ नका, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या पोलिसांच्या माता पित्यांना मानाचा मुजरा केला आहे. तसेच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:नाशिक महाराष्ट्र पोलीस अकाडमी दीक्षांत सोहळा व्हिडीओ 1

Body:नाशिक महाराष्ट्र पोलीस अकाडमी दीक्षांत सोहळा व्हिडीओ 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.