नाशिक - येवला शहरवासियांनी गुरुवारी सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला. लहान मोठ्यांसहीत सर्वांनीच हा दुर्मिळ क्षण अनुभवला आहे. तसेच काहींनी सूर्याच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा... ठाकरे सरकार ॲक्सिस बँकेला देणार धक्का.. पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळविण्याची मागणी
आज गुरूवारी 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे. नाशिकमधील येवला शहरातही सकाळी आठ वाजल्यापासून सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. शहरवासियांनी तसेच कॉलेजमधील विद्यार्थांना या सूर्यग्रहाणाच्या विविध छटा आज अनुभवायला मिळाल्या. गुरूवारी सकाळपासूनच शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. तरीही नागरिकांना हे सूर्यग्रहण पाहता आले. सकाळी सव्वाआठ वाजल्यापासून सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा... बीडमध्ये राजकारण पेटलं; विनायक मेटेंनी घरात घुसून धमकावल्याचा पं. स. सदस्याच्या दिराचा आरोप