ETV Bharat / city

नाशकात किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, मानसोपचार तज्ज्ञाचे मत - मनोरंजनाचे इंटरनेट

सोशल मीडिया, इंटरनेटच्या माध्यमातून जे मनोरंजन लहान मुलांपर्यंत नकळत्या वयात पोहोचत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराबाबत दाखवण्यात येते. त्यामुळे आपल्या समोर जे सादर कोले जाते ते योग्य आहे, असे लहान मुलांना वाटत असेत. त्यामुळे आपणच आपल्या मुलांच्या समोर गुन्हेगारीचे उदत्तीकरण करत आहोत. यामध्ये चूक कुणा एकाची नाही, त्यामुळे किशोरवयीन वयात मुलांना पालकांकडून व शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. तसेच मनोरंजनाचे इंटरनेट कसे वापरायचे हा संदेश तरुण पीढीपर्यंत पोहोचला पाहिजे. सामाजिक संस्थांकडूनही नियमित स्वरुपात मुलांचे प्रबोधन होणारे कार्यक्रम व्हायला हवे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी म्हणाले आ

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 14, 2022, 11:23 AM IST

नाशिक - शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या तलवारी, चॉपर, चाकूने चार जणांनी मिळून एका कंपनी व्यवस्थापकाची निर्घुण हत्या केली होती. या आरोपींमध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाशिक शहराची मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे मात्र गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. नाशिक शहरात 20 दिवसांत 8 खुनाच्या घटना घडल्या असून हाणामाऱ्या, चोऱ्या अशा घटनांमध्ये नाशिककर भयभीत आहेत. अशाच अनेक गुन्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश दिसून येत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

बोलताना मानसोपचार तज्ज्ञ

गुन्हेगारीच शॉर्टकट - गुन्हेगारीकडे वळणारा तरुण हा आर्थिक दुर्बळ घटकातील किंवा सर्वसामान्य घरातील असल्याचे अनेक गुन्ह्यामध्ये दिसून येत आहे. तरुण वर्ग हा केवळ मौजमजेसाठी आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारीचा शॉर्टकट शोधू लागल्याचे दिसते. हा शॉर्टकट तरुणाईला जरी सुरक्षित वाटत असला तरी तो थेट तुरुंगात घेऊन जाणारा आहे. तरुणाईने आपले तारुण्य कारावास भोगूण्याऐवजी चांगले जीवन जगण्यासाठी सार्थकी लावावे जेणेकरून देशाला आणि समाजाला त्याचा उपयोग होईल, असे पोलीस अधिकारी सांगता.

कायदा काय सांगतो - बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यातील तरतुदींचा वापर करून निर्णय घ्यावे हा या कायद्याचा उद्देश आहे. बालगुन्हेगारांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करते. नवीन तरतुदीनुसार गंभीर गुन्ह्यात बालकांचा सहभाग आढळल्यास 16 वर्षाच्या पुढील गुन्हेगारांना सज्ञान समजून खटला चालवला जातो.

इंटरनेटचा चुकीचा वापर - सोशल मीडिया, इंटरनेटच्या माध्यमातून जे मनोरंजन लहान मुलांपर्यंत नकळत्या वयात पोहोचत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराबाबत दाखवण्यात येते. त्यामुळे आपल्या समोर जे सादर कोले जाते ते योग्य आहे, असे लहान मुलांना वाटत असेत. त्यामुळे आपणच आपल्या मुलांच्या समोर गुन्हेगारीचे उदत्तीकरण करत आहोत. यामध्ये चूक कुणा एकाची नाही, त्यामुळे किशोरवयीन वयात मुलांना पालकांकडून व शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. तसेच मनोरंजनाचे इंटरनेट कसे वापरायचे हा संदेश तरुण पीढीपर्यंत पोहोचला पाहिजे. सामाजिक संस्थांकडूनही नियमित स्वरुपात मुलांचे प्रबोधन होणारे कार्यक्रम व्हायला हवे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी म्हणाले आहे.

हेही वाचा - Man Killed Sister In Law : दाजीचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध, तिची केली हत्या...नंतर रचला बनाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.