नाशिक - अवास्तव वाढीव वीज बिल प्रकरणी भाजपने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलीस कर्मचारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली. याचा ठपका ठेवत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजप आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर सरकावाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आंदोलकांनी बेकायदेशीर कृत्य केल्याने कारवाई -
शरणपूर रोडवरील तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ फक्त आंदोलनासाठी परवानगी दिलेली होती. असे असताना उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड यांच्या तक्रारीनुसार भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी बेकायदेशीर कृत्य केल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाजपचे महावितरणला टाळे ठोको आंदोलन, आ. देवयानी फरांदे यांच्यासंह २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे - भाजपचे महावितरणला टाळे ठोको आंदोलन
अवास्तव वाढीव वीज बिल प्रकरणी भाजपने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केलं होतं. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजप आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर सरकावाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.