नाशिक - निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. टी. ढोके यांच्या आदेशाने मोटार अपघातप्रकरणी नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले होते. मात्र नुकसानीची रक्कम देण्याचे आदेश देऊनही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने लासलगाव आगाराची बस निफाड येथे आली असता ती जप्त करण्यात आली.
हेही वाचा... भारतालाही 'वाडा'चा दणका, डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानं दोन खेळाडूंचे केलं निलंबन
लासलगाव आगाराची कसारा-लासलगाव ही बस (एम. एच. 14. बी .टी. 3812) निफाड बस स्थानकात दाखल होताच निफाड न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी ही बस न्यायालयाचे आदेश असल्याने ताब्यात घेतली. अचानक झालेल्या या प्रकाराने बसचे चालक, वाहक आणि बसमधील प्रवासी आश्चर्यचकीत झाले.
हेही वाचा... नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्येकडील राज्यात आंदोलन सुरू
काय आहे प्रकरण ?
दिनांक 27 नोव्हेंबर 2015 ला निफाड तालुक्यातील कोकणगाव फाटा येथे पिकअप व्हॅनला नंदुरबार आगाराच्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीतील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात नरेंद्र पंढरीनाथ धनवटे हे जागीच मृत झाले होते. याप्रकरणी नरेंद्र धनवटे यांच्या पत्नी सुनिता धनवटे यांनी परिवहन महामंडळा विरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने फिर्यादी सुनिता धनवटे यांना परिवहन महामंडळाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र मंडळाने भरपाई न दिल्याने सात डिसेंबरला महामंडळाची बस जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते.
हेही वाचा... बुलडाणा: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; दोघे अटकेत
यात 23 लाख 37 हजार 731 रुपये व व्याज अशी भरपाई देण्याचे निफाड न्यायालयाने आदेश दिले होते. ही रक्कम न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार निफाड बसस्थानकात लासलगाव आगाराची कसारा-लासलगाव ही बस येताच तिच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. भरपाईची रक्कम न भरल्यास बसचा लिलाव करून फिर्यादीचे पैसे दिले जाणार असल्याचे यावेळी वकिलांनी सांगितले.