ETV Bharat / city

नाशिक : जमिनीतून पाण्याच्या बुडबुड्यांसह येतोय विचित्र आवाज; नागरिकांमध्ये घबराट

गोंदे आणि भायगाव भूकंपप्रवण क्षेत्राजवळच असल्याने ग्रामस्थांना भीती वाटत आहे.

निरगुडे शिवारात डबक्याच्या पाण्यातून बुडबुड्यांसह विचित्र आवाज
author img

By

Published : Jul 14, 2019, 1:44 PM IST

नाशिक - पेठ तालुक्यात मागील काही दिवसांपासून एक विचित्र प्रकार घडत आहे. पेठच्या निरगुडे गावालगत जमिनीत अचानक बुडबुडे निघत आहेत. यासोबतच काही विचित्र आवाजासोबत जमिनीला मध्येच हादरेही बसत आहेत. याप्रकारांमुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

निरगुडे शिवारात डबक्याच्या पाण्यातून बुडबुड्यांसह विचित्र आवाज

जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार हरेष भामरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुडबुडे हवेचे आहेत. परंतु, हे बुडबुडे भूगर्भातील वाफेचे नाहीत. याचा अहवाल मेरीच्या भुगर्भीय नियंत्रण कक्षास देण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांनी याप्रकाराची भिती बाळगू नये, असे आवाहन तहसीलदार हरेष भामरे यांनी केले आहे.

गोंदे आणि भायगाव भूकंपप्रवण क्षेत्राजवळच असल्याने ग्रामस्थांना भीती वाटत आहे. तर, यापूर्वीही गावालगत असलेल्या दमणगंगा नदीवरील आमडोहातून विचित्र आवाज येत होते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

Intro:नाशिकच्या पेठ तालुक्यात गेल्या दोन तिन दिवसांपासून एक विचित्रच प्रकार समोर येतोय. पेठच्या निरगुडे गावालगत जमिनीत अचानक बुडबुडे निघत आहेत यासोबतच काही विचित्र आवाजही येत असून जमिनीला मध्येच हादरेही बसत असल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करत याबाबतचा अहवाल मेरीच्या भूगर्भीय नियंत्रण कक्षास पाठवला असून नागरीकांनी भिती बाळगु नये असे आवाहन करण्यात आले आहे.Body:याबाबत तहसीलदार हरेष भामरे यांनी घटनास्थळी भेट दिली बुडबुडे हवेचे असले तरीही भूगर्भातील वाफ नाही मात्र याचा अहवाल मेरी च्या भुगर्भीय नियंत्रण कक्षास देण्यात आला आहे नागरिकांनी भीती बाळगू नये असे आव्हान तहसीलदारांनी केलय.Conclusion:गोंदे, भायगाव, भूकंपप्रणव क्षेत्रा जवळच असल्याने ग्रामस्थांना भीती वाटणे नैसर्गिक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केलीय तसेच यापुर्वी गावालगत असलेल्या दमणगंगा नदीवरील आमडोहात वेगवेगळ्या आवाजाचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.