नाशिक - जिल्ह्यात राज्य सरकार विरोधी भाजपकडून ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात नाशिक मध्ये महिला भाजपचे आंदोलन होते. मात्र, हे आंदोलन होण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
राज्य सरकार विरोधी भाजपचा ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात सातत्याने महिला, मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विरोध करत राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यात भाजपने “आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.अशात नाशिक जिल्ह्यात देखील भाजप खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आले. मात्र, आमदार देवयानी फरांदे हे आंदोलनस्थळी जाण्या आधीच भाजपच्या महिला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जमावबंदीचे आदेश असताना महिला आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, असे असताना भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांसोबत वाद घातला. पोलिसांनी आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने भाजप महिला कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी अटक होण्याच्या धाकाने अनेक महिला सैरभैर झाल्याचे चित्र घटनास्थळी बघायला मिळाले.
प्रमूख मागण्या
महाराष्ट्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या घटनांकडे द्यावे, कोविड सेंटरमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नसून तेथील महिलांना सुरक्षा पुरवावी, महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कडक शासन व्हावे ह्यासाठी अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्टत चालून त्यासाठी स्वतंत्र सरकारी वकिलांची नेमणूक करावी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करावी.