ETV Bharat / city

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नाशकात भाजप आक्रमक - नाशिक भाजप आंदोलन बातमी

एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून नागपुरात काँग्रेस पक्ष भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दुसरी भाजपने वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

bjp protest against hike in electricity bill at nashik
वाढीव वीजबिल विरोधात नाशिक भाजप आक्रमक
author img

By

Published : Jul 3, 2020, 7:21 PM IST

नाशिक - लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या काळात नागरिकांना वीजवितरण कंपन्यांकडून आलेले अवाजवी वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाशिक शहराच्या विविध भागात आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात नागरिकांना अधिकची आलेली बिल रद्द करावी, असे आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून नागपुरात काँग्रेस पक्ष भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दुसरी भाजपने वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

वाढीव वीजबिल विरोधात नाशिक भाजप आक्रमक

हेही वाचा - हे सरकार साधु-संत आणि महंतांच्या विरोधात आहे का? आमदार विनायक मेटेंचा सवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात सर्वच उद्योग व्यवसाय पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अगोदरच आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असताना राज्य शासनाने सरासरी वीज बिल देण्यात यावे, अशा सूचना महावितरण विभागाला केली होती. मात्र, तीन महिन्यानंतर आलेले बीज बिल बघून सर्वसामान्यांना झटकाच बसला आहे. सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असताना महावितरणने अंदाजे भरमसाठ विज बिल दिल्याचे सांगत अधिकचे वीजबिल त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी नाशिक भाजपच्या वतीने करण्यात आली. यासाठी नाशिक शहरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

हेही वाचा - हौसेला मोल नाही, पिंपरी-चिंचवडमधील व्यक्ती वापरतोय चक्क पाच तोळे सोन्याचा मास्क

शरणपूर रोड परिसरात असलेल्या महावितरणाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करत ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच वीज नियामक कायद्या प्रमाणे अंदाजे वीजबिल देणे हे बेकायदेशीर असल्याने हे वीजबिलांना स्थगिती देण्यात यावी. तसेच आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी शासनाने एप्रिल महिन्यात लागू केलेली वीज दरवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

सरकारने वाढीव वीजदर आणि विज बिल रद्द न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे राज्य शासन या आंदोलनाची दखल घेत वीजबिल रद्द करणार की नाशिककरांच्या माथी वाढीव विजबिलाचा ताण पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.