ETV Bharat / city

मंत्री भारती पवारांच्या नेतृत्वात पालघरमधून जनआशीर्वाद यात्रा सुरू, नाशकातील भाजपा पदाधिकारी सहभागी ‌

तप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.सौ.भारती पवार यांनी पालघरमधून या यात्रेची सुरुवात केली. पुढे नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात 20 ऑगस्टपर्यंत या झंझावाती जनआशीर्वाद यात्रेचा दौरा असेल. या

पालघरमधून जनआशीर्वाद यात्रा
पालघरमधून जनआशीर्वाद यात्रापालघरमधून जनआशीर्वाद यात्रा
author img

By

Published : Aug 16, 2021, 12:45 PM IST

Updated : Aug 16, 2021, 12:57 PM IST

नाशिक/पालघर - भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून(सोमवार) प्रारंभ करण्यात आला. नाशिकसह राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार आहे. पालघरमधून सुरू झालेल्या या यात्रेचे नेतृत्व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या करीत आहेत. यात्रेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.सौ.भारती पवार यांनी पालघरमधून या यात्रेची सुरुवात केली. पुढे नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात 20 ऑगस्टपर्यंत या झंझावाती जनआशीर्वाद यात्रेचा दौरा असेल. या यात्रेत भाजपाचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपमय होणार आहे. यायात्रेसाठी भाजप कडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

पालघरमधून जनआशीर्वाद यात्रा
पालघरमधून जनआशीर्वाद यात्रा
नाशिक जिल्ह्यातून 60 वर्षानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामील होण्याचा बहूमान आदिवासी समाजातील उच्चशिक्षित डॉ.भारती पवार यांना देण्यात आला. त्यानंतर जनआशीर्वाद घेण्यासाठी भाजपाकडून यात्रा काढली जात आहे. पालघर शहरातील हुतात्मा चौकातून आज 16 ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी पालघर ,वाघोबा मंदिर, मानोर, चारोटी, महालक्ष्मी मंदिर, तलासरी, वनवासी कल्याण केंद्र हातणे, विक्रमगड, वादघाटना, जव्हार, मोखाडा व सायंकाळी त्रंबकेश्वर येथून यात्रा येणार आहे. मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी नाशिक येथील दहावा मैल, ओझर, पिंपळगाव, शिरवाडे फाटा, मंगरूळ, चांदवड, उमराना, सौंदाने, टेहरे, मालेगाव चौफुली, सटाणा नाका, सोयेगाव व मालेगाव परिसरातून यात्रा फिरेल.
पालघरमधून जनआशीर्वाद यात्रा सुरू
या यात्रेचा समारोप 20 रोजी धुळ्यात होणार आहेत-

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याकडून नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जात आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद,शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, लसीकरण केंद्रास भेट, भूमिपूत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, वरिष्ठ नागरिकांशी भेट, व्यापारी, डॉक्टर, उद्योजक भेट, भाजपाचे समर्थ बूथ अभियान आदीशी संवाद साधून मंत्री पवार आशीर्वाद घेणार आहेत. दरम्यान या यात्रेचा समारोप 20 ऑगस्टला धुळे होते होणार असल्याची माहिती यात्रेच्या आयोजकांकडून देण्यात आली आहे.

यात्रेमध्ये नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप पालवे ,जिल्हाध्यक्ष केदा आहेर, लक्ष्मण सावजी , विजय साने, महापौर सतिश कुलकर्णी, प्रशांत जाधव गोविंद बोरसे,पवन भागुरकर भाजपाचे नाशिक मधील काही नेते हे पालघर पासून या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

Last Updated : Aug 16, 2021, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.