ETV Bharat / city

नाशिकमध्ये भाजप उमेदवारीची बंडखोरी, सरोज अहिरे राष्ट्रवादीकडून लढणार

नाशिकमधून भाजपला बंडखोरीचा पहिलाच फटका बसला आहे. विद्यमान नगरसेविका सरोज आहिरे यांना राष्ट्रवादीकडून देवळाली मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सरोज अहिरे
author img

By

Published : Oct 4, 2019, 8:00 AM IST

नाशिक - भाजप नगरसेविका तसेच महिला बालविकास समितीच्या सभापती सरोज आहिरे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून त्यांना देवळाली मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये भाजप उमेदवारीची बंडखोरी, सरोज अहिरे राष्ट्रवादीकडून लढणार

नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसला आहे. सरोज आहिरे यांनी गुरूवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर अहिरे यांना पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून देवळाली मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात आता बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... नाशिक पश्चिम विधानसभेची जागा माकपला; राष्ट्रवादीचे हिरे यांची बंडखोरी

नाशिकच्या भाजप नगरसेविका सरोज आहिरे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला., यावेळी भुजबळ यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. यानंतर त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे देवळाली विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून भुजबळांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला.

हेही वाचा... उमेदवारी जाहीर न केल्याने आमदार बाळासाहेब सानप नाराज​​​​​​​

Intro:नाशिक मधून भाजपला पहिलाच बंडखोरीचा फटका बसलाय...विद्यमान नगरसेविका तसेच महिला बालविकास समितीच्या सभापती सरोज आहिरे यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय.Body:तर सरोज अहिरे यांना देवळाली मतदार संघाची उमेदवारी देखील राष्ट्रवादी कडून देण्यात आलीये... त्यामुळे भाजपला आता देवळाली मतदार संघातून फटका बसण्याची शक्यता आहे.....

बाईट : सरोज अहिरे (देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी उमेदवार )Conclusion:नाशिकच्या भाजप नगरसेविका सरोज आहिरे यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे देवळाली विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना भुजबळ यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,राजाराम धनवटे, सोमनाथ बोराडे, सचिन पिंगळे, मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे,संजय पोरजे,बाळासाहेब मते,विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख,नगरसेविका समीना मेमन, माजी नगरसेविका वैशाली दाणी,शोभाताई आवारे,आदी मान्यवर उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.