नाशिक नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील Nashik Road Central Jail बंदीवानांनी तयार केलेल्या शाडू मार्तीच्या आकर्षक गणेश मूर्ती Attractive Ganesha Idols by Shadu Murti यंदाही भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या गणेश मूर्ती Ganeshotsav 2022 प्रदर्शनाचे व विक्रीचे उदघाटन कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई DIG of Prisons Yogesh Desai अणि नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे Nashik Police Commissioner Jayant Naiknaware यांच्या हस्ते करण्यात आले.
कैद्यांमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला गणेशोत्सव जवळ आला आहे. गणपतीचे स्वागत करण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह वाढत चालला आहे. लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेश भक्त तयारीला लागलेले आहे. बाजारात देखील सजावटीच्या वस्तूंसह, आकर्षक गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. नाशिक कारागृहात एक रंगकामगार कैदी होता. त्याने ही कला इतर कैद्यांना शिकवली. तो दोन वर्षांपूर्वी बाहेर आला. तरी कारागृहात मुर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. त्याची कला तो इतर कैद्यांना देऊन गेला. यातून कैद्यांमध्ये देखील एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.
११ कैद्यांनी ६५० मूर्ती बनवल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये २०१८ पासून गणेश मुर्तींची विक्री केली जाते. दरवर्षी या आकर्षक मुर्तींना नाशिक शहरातील नागरिकांसह महाराष्ट्रातल्या नागरिकांची मोठी मागणी असते. जेलरोडवरील कारागृहाच्या प्रवेशव्दारा शेजारी असलेले प्रगती केंद्र येथे भाविकांना मूर्ती निवडून बुकींग करता येतील. मूर्ती विक्रीमुळे बंदिवान कैद्यांना रोजगार मिळत असून, कारागृहालाही चांगला महसूल मिळत आहे. जवळपास ११ कैद्यांनी ६५० मूर्ती बनवल्या आहेत. याचे दर ८०० रुपये पासून तर ४५०० हजारपर्यंत असणार आहे. भाविकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी व मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली आहे. यातील एकही मूर्ती शिल्लक राहत नाही. कारण, बाहेर दुकाना पेक्षा कमी किमतीमध्ये आकर्षक व सुबक मुर्ती भेटत असतात..