नाशिक - नाशिकमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या अहवालात एका कोरोना संशयीताचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा दोन वर गेलाय. नासिक जिल्हा प्रशासनाने या बाबत अधिकृत माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे या नव्यानं आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची देखील मरकज हिस्ट्री असल्याने प्रशासना समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नाशिक मध्ये आढळून आलेला हा कोरना पॉझिटीव्ह रुग्ण 44 वर्षाचा असून नाशिक मनपाच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.
नाशिकमध्ये आजवर एकच कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण असल्यामुळे नाशिककर याला फारस गांभीर्याने घेत नव्हते. मात्र आता दुसरा कोराना रुग्ण आढळुन आल्याने प्रशासकीय यंत्रणे बरोबरच नाशिकरांची देखील चिंता वाढली आहे. नाशिक मध्ये आढळून आलेला हा कोरूना पॉझिटीव्ह रुग्ण मागील दिवसात कुणाकुणाच्या संपर्कात होता याचा शोध आता वैद्यकीय यंत्रणा घेत आहे. नाशिक शहरातील हा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणेने समोरील आव्हान अधिक वाढलं आहे. तर नाशिकरांनी देखील पुढील काळात प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे.