ETV Bharat / city

ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Jan 11, 2021, 7:52 PM IST

मराठी साहित्य क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या मराठी साहित्यिकांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे जनस्थान पुरस्कार दिला जातो. यंदा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १० मार्चला होणाऱ्या विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

kusmagraj janasthan
मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्काराची घोषणा

नाशिक - मराठी साहित्य क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर विशेष ठसा उमटविणाऱ्या मराठी साहित्यिकांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे जनस्थान पुरस्कार दिला जातो. यंदा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १० मार्चला होणाऱ्या विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड. विलास लोणारी यांनी ही माहिती दिली आहे.

पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ...

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक आहेत..१० मार्च रोजी नाशिक येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात कर्णिक यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विचार करून ठिकाण आणि इतर गोष्टी ठरवल्या जाणार असल्याचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले आहे. एक वर्षाआड दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे ..कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यापूर्वी अरुण साधू ,भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, विजय तेंडुलकर अशा साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा - लस नेण्यासाठी सहा कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.