नाशिक : पुतणीला मोबाईल दाखवून खरेदी करण्यास सांगणाऱ्याशी वाद घातल्याचा राग अनावर झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या व्यक्तीवर धारदार चाकूने सपासप वार करुन हत्या ( Murder By Stabbing In Nashik ) केल्याची घटना त्र्यंबक राेडवरील पीटीसीसमाेरील उत्कर्ष नगरात घडली. ही घटना बुधवारी (दि.१४) मध्यरात्री दीड वाजता घडली. न्यायालयाने संशयिताला पोलीस कोठडी सुनावली ( Accused Arrested In Murder Case Nashik ) आहे. रमेश नारायण ताठे असे मृताचे नाव आहे. तर गौरव सुहास जाधव (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच गंगापूर पाेलिस ठाण्याचे ( Gangapur Police Station ) वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रियाज शेख व पथक दाखल झाले.
चाकू पोटात खुपसला : नाशिकमध्ये पोलिस आयुक्त दिपक पांडेय आणि महसूल विभाग ( IPS Dipak Pandey Vs Revenue Department ) यांच्यात वाद सुरु असतांनाच दुसरीकडे मात्र नाशिकची कायदा सुव्यवस्थ्या ही धोक्यात आलीय. आंबेडकर जयंतीच्या दिवशीच सराईत गुन्हेगाराने एकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली असून, या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्र्यंबकरोडवरील उत्कर्षनगर परिसरातील रहिवासी असलेला रमेश ताठे हा रात्री शालिमार परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून घराजवळ आला. मात्र, याचवेळी सराईत गुन्हेगार गौरव जाधव हा त्याच्याजवळ आला. त्याने त्याच्याशी वाद घालत पोटात चाकू खुपसून रमेशची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी गौरवच्या भावाने रमेश ताठेच्या पुतणीला मोबाईल दाखवत मोबाईल खरेदी करण्यास सांगितले होते. याचा राग आल्याने रमेशने गौरवच्या भावाशी वाद घातला होता. याचाच राग मनात धरत हा प्रकार घडला. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी आरोपी गौरव जाधव विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आलीय. त्याच्यावर यापूर्वी पॉक्सोसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' तरुणाने अखेर आत्महत्या करतच संपले जीवन