सांगली - कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सांगलीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आले.
यवतमाळमध्ये धरणे आंदोलन
केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता शेतकरी मरतील पण कायदा रद्द केल्याशिवाय परत येणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला काँग्रेसने समर्थन दिले आहे. तसेच विदर्भातील पाच हजार शेतकरी या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून आता यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन देण्यात आले.
नाशकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन -
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (गुरुवारी) महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तहसील कार्यालयावर निषेध करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान संघर्ष व समन्वय समिती, यासह वेगवेगळ्या शेतकरी आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येईल केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी डफली वाजवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच केंद्रविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा- १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार विधिमंडळाचे अधिवेशन
हेही वाचा- विधानपरिषद रणधुमाळी : धुळ्यातून भाजपचे अमरिश पटेल विजयी; पाहा LIVE अपडेट्स..