नाशिक : नाशिकमध्ये खाजगी प्रवासी बस जाळून खाक झाली (private passenger bus caught fire) आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः जळून मृत्यू (passenger burnt to death) झाला. यात लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना आज पहाटे 4 वाजून 20 मिनीटांनी घडली.
आगीमुळे प्रवाशांचा कोळसा - औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की, त्यात 14 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बस चालकाचाही मृत्यू झाला.
बसमध्ये स्फोट - यवतमाळ येथून ही बस काल रात्री नाशिकच्या दिशेने रवाना झाली. त्यातून 30 पेक्षा अधिक प्रवाशी प्रवाशी होती. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकून फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवासी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच भाजून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत: दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे Guardian Minister Dada Bhuse यांनी मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा assistance of Rs 5 lakh to the kin of the deceased शासनाने केली असल्याचे सांगितलं. तसेच ते शासकीय आयोजित दौरा चंदिगढ येथे असताना पालकमंत्री दादा भुसे तेथून त्वरित माघारी फिरलेले आहेत. सध्या ते घटनास्थळी दाखल होण्यासाठी जलदगतीने निघालेले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश : नाशिक बस दुर्घटनेच्या चौकशीचे देखील आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. दुर्घटनेसाठी कोणी जबाबदार असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अमित शाह यांचे ट्विट : दरम्यान, या अपघातांवर आता गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे. 'नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो.', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो.
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो.
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2022नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो.
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2022