ETV Bharat / city

कोरोना लस देण्यासाठी अ‌ॅक्शन प्लॅन तयार, स्टोरेज उपलब्ध - पालकमंत्री भुजबळ - नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ न्यूज

'सात दिवसात फी भरा नाहीतर ऑनलाईन शिक्षण लिंक बंद करू असा वाद सुरु आहे.' पण हा विषय अजून माझ्याकडे आला नाही. कोरोनामुळे पालक आणि शैक्षणिक संस्था दोघेही अडचणीत आहेत. यात चर्चा करून तोडगा काढू, असे भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ न्यूज
नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ न्यूज
author img

By

Published : Dec 11, 2020, 7:17 PM IST

नाशिक - 'जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी आहे. लस उपलब्ध झाल्यावर ती नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचा अ‌ॅक्शन प्लॅन तयार आहे. लस साठवणुकीसाठी निकषांनुसार योग्य स्टोरेज तयार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कोरोना लस देण्यासाठी अ‌ॅक्शन प्लॅन तयार, स्टोरेज उपलब्ध - पालकमंत्री भुजबळ

'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे लोण देशभरात पसरत आहे'

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढाव‍ा बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे लोण आता देशात पसरत आहे. राज्यात अन्न धान्याचा सध्या मुबलक साठा आहे. मात्र, आंदोलन आक्रमक झाले तर, अन्नधान्य पुरवठ्यावर फरक पडेल. पंजाब, हरियाणातून अनेक देशांत अन्नधान्य निर्यात केले जाते. त्यावरही परिणाम जाणवेल. यूपीए सरकारने दिलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. खाजगीकरण झाले तर होणारा तंटा सोडवणार कोण, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. केंद्र सरकारने, देशाच्या भल्यासाठी हा प्रश्न त्वरीत लक्ष देऊन सोडवावा,' अशी भूमिका त्यांनी भुजबळ यांनी मांडली.

हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने फडणवीस यांचा सल्ला घ्यावा - नरेंद्र पाटील

खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कासंबंधी प्रतिक्रिया नाही

'सात दिवसात फी भरा नाहीतर ऑनलाईन शिक्षण लिंक बंद करू असा वाद सुरु आहे.' पण हा विषय अजून माझ्याकडे आला नाही. कोरोनामुळे पालक आणि शैक्षणिक संस्था दोघेही अडचणीत आहेत. यात चर्चा करून तोडगा काढू, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

पवार 'यूपीए' अध्यक्ष झाले तर आनंद

'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीए अध्यक्षपदी निवड होणार' अशी जोरदार चर्चा आहे. याबाबत विचारले असता, पवार यूपीए अध्यक्ष झाले तर, नक्कीच आनंद होईल. मात्र, अशी कोणतीही चर्चा अद्याप नाही. फक्त माध्यमांमध्ये ही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले,' असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - 'महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभारामुळेच बीडीडी चाळीसह धारावीचा विकास रखडला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.