नाशिक : शीतपेयामधून गुंगीचे औषध पाजून मेकअप सलूनमध्ये महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार कारण्यात ( Rape In Nashik ) आला. त्याचे फोटो काढून हे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत वारंवार पिडितेवर वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित मेकअप आर्टिस्ट ललित निकम यास अटक केली ( Makeup Artist Arrested In Rape Case ) आहे.
गुंगीचे औषध टाकलेले शीतपेय तिला पाजले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड भागातील पराग अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या मेकअप सलूनमध्ये मे 2019 दरम्यान ही घटना घडली. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एन. ललित मेकअप क्लासेसचे संचालक ललित निकम याने स्विफ्ट कारमध्ये पिडीता बसलेली असताना गुंगीचे औषध टाकलेले शीतपेय तिला पाजले. त्यानंतर पिडीतेला स्वतःच्या सलूनमध्ये नेऊन तिथे जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी काढलेले फोटो पिडीतेच्या पतीला आणि सार्वजनिक करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध तसेच अनैसर्गिक संबंध केले.
पती भासवून गर्भपात केला
या घटनेत पिडीता गर्भवती झाली. तेव्हा 28 जुलै 2019 रोजी गंजमाळ येथील डॉ. वाघ हॉस्पिटलमध्ये पिडीतेला नेण्यात आले. तिथे पिडीता ही पत्नी असल्याचे डॉ. वाघ यांना सांगून व तशी कागदोपत्री नोंद करून पिडीतेला सह्या करण्यास भाग पाडत पिडीतेच्या इच्छेविरूद्ध गर्भपात करण्यात आला. गर्भपात करण्यासाठी ललित निकम याची पत्नी नेहा निकम, मित्र जयेश वाघ व त्याची पत्नी ज्योती वाघ यांनी धमकावले होते. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. तर त्यानंतरही ललित निकम याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पिडीतेला पुन्हा गर्भधारणा झाली. त्यानंतर महिलेने गंगापूर पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ललित निकम, जयेश वाघ, नेहा निकम, ज्योती वाघ यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांनी भादंवि ३७६(२) (एन), ३७७, ३२८, ३१३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यात मेकअप आर्टिस्ट ललित निकम यास अटक केली आहे.