ETV Bharat / city

Complaint File Against Madhukar Pichad : सुनेच्या तक्रारीवरून भाजप नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर गुन्हा दाखल - पंचवटी पोलीस ठाणे

मधुकर पिचड (Former Minister Madhukar Pichad) यांचा मुलगा किरण याने 2016 मध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या (Madhukar Pichad Son Suicide) केली होती. या सुसाई़ड नोटमध्ये किरणने पत्नी राजश्रीचा उल्लेख करून आयुष्य संपवले होते. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

Madhukar Pichad
Madhukar Pichad
author img

By

Published : Dec 5, 2021, 5:34 PM IST

Updated : Dec 5, 2021, 5:58 PM IST

नाशिक - भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड (Former Minister Madhukar Pichad) घरातील वादामुळे अडचणीत सापडले आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मुलाची आत्महत्या आणि सुनेला जीवे मारण्याची धमकी, या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पीडितेचे वकील उमेश वालझाडे यांची प्रतिक्रीया
मधुकर पिचड यांचा मुलगा किरण याने 2016 मध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या (Madhukar Pichad Son Suicide) केली होती. या सुसाईट नोटमध्ये किरणने पत्नी राजश्रीचा उल्लेख करून आयुष्य संपवले होते. तर दुसरीकडे किरण-राजश्री यांचा मुलगा जय यानेही आई राजश्रीवर आक्षेप घेतला होता. आता याच प्रकरणात, माझ्यावर अन्याय झाल्याची तक्रार राजश्री यांनी कोर्टात केली आहे.
तक्रारीत काय आहे
पीडित सुनेच्या म्हणण्यानुसार सासरे मधुकर पिचड, सासू कमलाबाई पिचड आणि मुलगा अश्विन व इतरांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी मानसिक छळ करत घराबाहेर काढून दिले. या विरोधात पोलिसात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तक्रारीची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली असल्याची माहिती पीडितेने दिली आणि पीडितेच्या वतीने वकील उमेश वालझाडे यांनी बाजू मांडली. शनिवारी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वरिष्ठ निरीक्षक डॉ सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Last Updated : Dec 5, 2021, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.