नाशिक :- राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील जवळपास ८० रस्ते,चौक आणि बस त्यांची जातीवाचक नावं बदलली जाणार आहेत. राज्याच्या समाजकल्याण विभागाने वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासंदर्भात आदेश काढला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील वस्त्या, रस्ते,चौक अशा जवळपास ८० ठिकाणांची नावे बदलण्यात येतील.
जातीवाचक रस्ते, वस्त्यांचे नव्याने नामकरण होणार
राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील जवळपास ८० रस्ते चौक आणि बस त्यांची जातीवाचक नावं बदलली जाणार आहेत. या पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी शहरातील कोळीवाडा , कुंभार गल्ली, तेली गल्ली, मातंग वाडा, पिंजार घाट, सुतार गल्ली, तांबट लेन, भोई गल्ली अशा जवळपास ८० रस्ते आणि वस्त्यांना जातीवाचक नाव असल्याचा अहवाल दिला आहे. आता या सर्वच भागांना नवीन नाव दिली जातील.
जातिवाचक नाव बदलण्याचा निर्णय
शहरातील आणि गावठाण भागातील अनेक रस्ते चौक आणि बस त्यांना जुन्या परंपरेनुसार जातीवाचक नावे चालत आली आहेत मात्र त्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखत असल्यामुळे सामाजिक सलोखा जपण्यासाठी सदर जातिवाचक नाव बदलण्याचा निर्णय राज्याच्या समाजकल्याण विभागाने घेतला आहे . राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या निर्देशानुसार आता नाशिक शहरातील जवळपास ८० रस्ते वस्त्यांची जातिवाचक नाव बदलली जाणार आहेत.
हेही वाचा - पद्मश्री पुरस्कार मिळवण्यासाठी कोणाचे तळवे चाटले? कृपाल तुमानेंचा सवाल