नाशिक - निसर्ग वादळामुळे शहरामध्ये एका दिवसांत तब्बल 64 झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच झाडाखाली अडकलेली एक रुग्णवाहीका आणि अन्य चार मोटारगाड्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी बाहेर काढल्या आहेत. तसेच जुने नाशिक भागातील दोन घरांच्या धोकादायक भिंती काही प्रमाणात कोसळल्याने त्या अग्निशमन दलाने खाली उतरवल्या आहेत.
चार ठिकाणी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे किरकोळ आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आज 4 मे रोजी दुपार पर्यंत महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेली झाडे. तसेच चारचाकींवर पडलेल्या फांद्या हटवण्याचे काम केले. अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा येत होता. आज अग्निशमन दलाच्या सहकार्याने रस्ते मोकळे झाले आहेत. वादळाच्या तडाख्यात कोणतीही जीवितहानी न झाल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
नाशकातील घटनांचा आकडा
झाडे पडणे 64
घरे पडणे 02
आग लागणे 04
अग्निशमन विभागाला आलेले फोन 70