नाशिक - शहर पोलिसांच्या 'भरोसा सेल'मध्ये मागील सहा महिन्यात पती-पत्नीच्या वादाचे तब्बल 375 अर्ज दाखल झाले आहे. यात मुख्य कारण विवाहबाह्य संबंध ठरत असून यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून पती पत्नीचं समुपदेशन करून
त्यांच्यात समेट घडवण्याचे काम नाशिकचे भरोसा सेल करत आहे.
विवाहबाह्य संबंध ठरतायत कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे मुख्य कारण कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ज्या प्रकारे नागरिकांचे उद्योग धंदे, नोकऱ्या गेल्यात तसेच अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गवर आहे. याचे मुख्य कारण ठरत आहे अनैतिक, विवाहबाह्य संबंध. लॉकडाऊन काळात सगळ्यांच्या मनाविरुद्ध घरात राहणे भाग पडले होते. या काळात कधी नाही इतका वेळ पती-पत्नींनी एकत्र घालवला. कुटूंबासोबत कधी नाही तो इतका वेळ घालवण्याचा अनेकांना फायदा झाला. तर काही कुटुंबात पती-पत्नीचे विवाह बाह्य संबंधाचे बिंग फुटले आणि यातून निर्माण झालेले वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन घटस्फोटपर्यंत पोहोचले आहेत. एकट्या नाशिकच्या भरोसा सेलमध्ये मागील सहा महिन्यात पती-पत्नीच्या वादाचे 375 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
महिलांव होणारे मानसिक, शारीरिक अत्याचार, हुंडाबळी सारख्या घटनांना न्याय देण्यासाठी पोलिसांकडून भरोसा सेलची स्थापणा करण्यात आलीय. मात्र, लॉकडाऊन काळात पती-पत्नीच्या वादाचे प्रकरण वाढल्याने भरोसा सेल मधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवरील ताण देखील वाढला आहे.लॉकडाऊन काळात आमच्याकडे 375 अर्ज दाखल झाली असून लॉकडाऊन काळात पती-पत्नीने बराच काळ एकत्र घालवल्याने अनेकांमधील वाद उफाळून आले आहेत. यात आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रास सोबत विवाहबाह्य अनैतिक संबंधचे प्रमुख कारण दिसून येत आहे. अनेक महिलांनी वादाचे वेगवेगळे कारणे सांगितले आहेत. यात पती घरी कुटुंबाला वेळ देत नाही, रात्री उशिरा घरी येणे, पती-पत्नी मधील संवादाचा अभाव, आर्थिक टंचाई असे अनेक प्रश्नांवरून पती-पत्नीमध्ये वाद होत आहे. असे प्रकरण हाताळताना आम्ही पती-पत्नीची बाजू एकूण समजून घेतो बऱ्याच प्रकरणात पती किंवा पत्नी लगेच विवाहबाह्य संबंधांबाबत लगेच उघड होत नाही. मग अशा वेळी त्याना विश्वासात घेऊन त्यांना कुटूंब जबाबदारी, मुले, सामजिक भान यांची माहिती करून त्यांना समुपदेशन करावे लागत असल्याचे भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक संगीता निकम यांनी सांगितले. बहुतांश प्रकरणात पती-पत्नीत समेट होतो तर काही वाद मग न्यायालयात जातात.पती पत्नीत विश्वास असणे महत्वाचे...
दोन वेगवेगळ्या कुटूंबातून पती, पत्नी एकत्र येत असतात. अशात प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण असतात आज कोणी ही परिपूर्ण नाही. त्यामुळे पती-पत्नीत संवाद असणे गरजेचे आहे. एकमेकांनी दोघांची काळजी घेणं महत्वाचे आहे. तसेच एकमेकांनवर विश्वास असला तर पती-पत्नीमधील वाद टाळता येऊ शकेल, असे मतं पोलीस निरीक्षक संगीता निकम यांनी व्यक्त केले.