ETV Bharat / city

नाशिकमध्ये 'तौक्ते'च्या तडाख्यात शेतपिकांचे सुमारे तीन कोटींचे नुकसान

author img

By

Published : May 24, 2021, 9:16 PM IST

तौक्ते चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. यामध्ये १ हजार ६५२.६१ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले असून 2 कोटी ९६ लाख ६१ हजारांचे नूकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा नुकसानीचा अहवाल राज्यशासनाला पाठवला आहे.

शेतकर्‍यांचे लक्ष
शेतकर्‍यांचे लक्ष

नाशिक - अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. यामध्ये १ हजार ६५२.६१ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले असून 2 कोटी ९६ लाख ६१ हजारांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा नुकसानीचा अहवाल राज्यशासनाला पाठवला आहे. अस्मानी संकटाने हतबल झालेल्या शेतकर्‍यांच्या नजरा आता शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत.

नाशकात 'तौक्ते' वादळामुळे 2 कोटी 96 लाखांचा तडाखा, शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष

१,६५२ हेक्टरवरील पिके, फळबागा उद्ध्वस्त
गतवर्षीच्या निसर्ग चक्रिवादळानंतर यंदा पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळ धडकले. नाशिक जिल्ह्यातही त्याचा परिणाम पहायला मिळाला. सलग तीन दिवस सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. तुलनेने पश्चिम किनारपट्टीच्या जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांना या वादळाचा तडाखा बसला. अनेक घरांची पडझड झाली. काही ठिकाणी घराचे पत्रे, कौले उडाल्याने घरांचे अंशत: नुकसान झाले. सुदैवाने जीवित व पशूहानी झाली नाही. मका, बाजरी, कांद्यासह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले. सर्वाधिक तडाखा हा आंब‍ा, पेरू, डाळींब या फळबागांना बसला. एकूण १ हजार ६५२ हेक्टरवरील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

२७३ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड
अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रिवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून २७३ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर, फळबागांमध्ये आंबा व डाळींबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यांना बसला आहे. कोरोना संकटातही प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करत हा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागून आहे.

एकुण नुकसान आकडेवारी
१) बाधित गावे - ३२२
२) एकूण बाधित शेतकरी - ८२४३
३) बागायत पिकाखालील क्षेत्र - १९.१४ हेक्टर
४) बहुवार्षिक फळ पिके - १६३३.४७ हेक्टर
५) नुकसान - २ कोटी ९६ लाख ६१ हजार

हेही वाचा - दोघांनी आकाशात बांधली साताजन्माची गाठ, DGCA ने दिले चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.