ETV Bharat / city

Nashik Bus Burning Update : नाशिक बसमध्ये कोळसा झालेल्या 12 मृतदेहांची डीएनए चाचणीत ओळख पटली - latest news from Nashik

नाशिक : येथे घडलेल्या खाजगी बस अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला (Nashik bus burning incident) होता. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी (Nashik bus burning case body identification) प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. अखेर डीएनए चाचणीचा (DNA test for body identification) वापर करून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात प्रशासनाला (administration efforts for burned body identification) यश आले.

Nashik Bus Burning Update
Nashik Bus Burning Update
author img

By

Published : Oct 14, 2022, 7:58 PM IST

नाशिक : येथे घडलेल्या खाजगी बस अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला (Nashik bus burning incident) होता. 30 प्रवाशांची क्षमता असताना सुद्धा 48 जण या बसमध्ये प्रवास करत होते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी (Nashik bus burning case body identification) प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. अखेर डीएनए चाचणीचा (DNA test for body identification) वापर करून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात प्रशासनाला (administration efforts for burned body identification) यश आले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे; मात्र असं असलं तरी खाजगी बस ट्रॅव्हल्समध्ये व्यवसायिक वाहतुकीचे नियम ढाब्यावर बसवून अवैध वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे. आता प्रवाशांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.

बाराही प्रवाशांची ओळख पटली- यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसने (7 ऑक्टोबर, शनिवारी ) पहाटे गुजरातहून कोळसा वाहून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने बसला आग लागून यात 12 प्रवाशांच्या बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. यात बहुतेक मृतदेहाचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले होते. अखेर जिल्हा प्रशासनाने या सर्वांची डीएनए चाचणी केल्यानंतर सर्व 12 मृतदेहांची ओळख पटली आहे.

म्हणून करावी लागली डीएनए चाचणी - बस अपघातात जळालेले 12 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. त्यातील बहुतांश मृतदेहाची ओळख पटवणं अवघड होतं. त्यानंतर आम्ही त्यांची डीएनए चाचणी करण्याचे ठरवलं. अशात त्यांच्या कुटुंबातील मुलगा आणि आई-वडिलांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे गुणसूत्र तपासण्यात आले. सुरुवातीला नऊ मृतदेहांची ओळख पटली. मात्र तीन मृतदेह अक्षरशः कोळसा झाले होते. यात सुद्धा आम्ही डीएनए चाचणी यशस्वीरित्या करून तीनही मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डीएनए चाचणी कशी करतात - गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचनेमध्ये 46 गुणसूत्र असतात. यात मानवीू रंगरूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, आकार, कातडीचा रंग, डोळ्यांचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्र तंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्तीच्या माता-पित्यांची ओळख निश्चित करता येते.

सर्वांना शासकीय मदत मिळणार- बस अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर घटनेच गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली होती. आता यातील सर्व 12 मृतदेहाची ओळख पटली असून त्याबाबतचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयात पाठवला आहे. तेथून हा प्रस्ताव संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार असून वारसांची माहिती घेतल्यानंतर ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी दिली.

ओळख पटलेले मृतदेह- लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर,अजय शंकर कुचनकर,उद्धव पंढरी भिलंग,कल्याणी आकाश मुधोळकर,साहिल जितेंद्र चंद्रशेखर,ब्रम्हादत्त सोमाजी मनवार,वैभव वामन बिलिंग,अशोक सोपान बनसोडे, सुरेश लक्ष्मण मुळे,हरीभाऊ तुकाराम भिसणकर,मितेश यादव सांगळे,गजानन शालिकराम लोनकर

आरटीओची मोहीम - नाशिकमध्ये झालेल्या ट्रॅव्हल्सच्या बस अपघात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचं आणि बस चालक वेगाने बस चालवत असल्याचे आढळून आल्यानंतर आरटीओ विभागाने सर्वच खाजगी ट्रॅव्हल्स बस विरोधात मोहीम उघडली आहे. नाशिकच्या रस्त्यावरती बसेसची तपासणी केली जात असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच काही दिवसापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक पथकांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.